Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. आता युक्रेन अध्यक्षांच्या सुंदर पत्नीचा फोटो समोर आला आहे. तिनेही संवाद साधला आहे.
कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. त्यामुळे युद्ध आता कोणते वळण घेते याकडे संपर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) रशियाच्या बॉम्बहल्ला दरम्यान सतत आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. ते आपल्या सैनिकांना केवळ प्रोत्साहनच देत नाहीत तर आपल्या देशातील नागरिकांना रशियाविरुद्ध युद्ध पुकारण्यास प्रेरित करत आहेत. अशावेळी त्यांच्या सुंदर पत्नीचा फोटो समोर आला आहे. तिनेही संवाद साधला आहे.
पत्नीने दिला युक्रेन अध्यक्षांना पाठिंबा
अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी झेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना त्यांनी आपला देश सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी रशियाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्का यांनीही त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ओलेना हिने देश सोडण्याच्या सूचनाही धुडकावून लावल्या आहेत. आपल्या पतीसोबत युक्रेनमध्ये राहून रशियाविरुद्ध लढा देणार आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत उत्साह वाढवला
आमची सहकारी वेबसाइट WION नुसार, ओलेना झेलेन्स्का (Olena Zelenska) यांनी इंस्टाग्रामवर एक छान पोस्ट लिहिली, 'माझ्या प्रिय युक्रेनियन बांधवानो! आज मी तुम्हा सर्वांना पाहतेय. मी टीव्हीवर, रस्त्यावर, इंटरनेटवर प्रत्येकजण पाहत आहे. मी तुमच्या पोस्ट आणि व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला माहित आहे काय? तुम्ही आश्चर्यकारक आहात ! तुमच्यासोबत या देशात असल्याचा मला अभिमान आहे!'
ओलेना झेलेन्स्का आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, 'आणि आज मी घाबरणार नाही आणि अश्रू काढणार नाही. मी शांत आणि आत्मविश्वासाने राहीन. माझी मुलं मला पाहत आहेत. मी त्याच्या शेजारी, माझ्या नवऱ्याच्या शेजारी असेन आणि तुझ्यासोबत.'
आम्ही सैन्य आहोत आणि सैनिकही आम्हीच आहोत - ओलेना
युक्रेनची प्रथम महिला ओलेना यांनीही एका पोस्टमध्ये नवजात बाळाचा फोटो शेअर केला आहे. ओलेनाने लिहिले, 'या मुलाचा जन्म कीव बॉम्ब शेल्टरमध्ये झाला. हे पूर्णपणे भिन्न परिस्थितीत, शांततापूर्ण आकाशात घडले पाहिजे. मुलांनी हेच पाहावे. आम्ही सैन्य आहोत आणि सैनिकही आम्हीच आहोत आणि बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये जन्मलेली मुले शांततापूर्ण देशात राहतील ज्याने स्वतःचा बचाव केला आहे.
ओलेना झेलेन्स्काचे 2003 मध्ये लग्न
व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि ओलेना झेलेन्स्का यांचे 2003मध्ये लग्न झाले. दोघांना दोन मुले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून ती आपल्या पतीच्या समर्थनार्थ आपल्या देशातील लोकांशी सोशल मीडियावर सतत संवाद साधत आहे.
युक्रेनची प्रथम महिला ओलेना यांचा जन्म 1978 मध्ये Kryvyi Rih येथे झाला आहे. त्यांनी आर्किटेक्चरचा कोर्स केला. पण नंतर लेखन हा त्यांचा व्यवसाय बनवला. स्टुडिओ क्वार्टल 95 नावाच्या प्रोडक्शन हाऊसची ती सह-संस्थापक आहे. देशात प्रसारित होणारे अनेक कार्यक्रम आणि चित्रपट लिहिण्याचे श्रेय त्यांना जाते.
युक्रेनच्या राजकारणात सक्रिय
युक्रेनची प्रथम महिला म्हणून त्यांनी शालेय मुलांमध्ये पोषण सुधारणांवर काम केले आहे. देशातील लैंगिक सुरक्षा, सांस्कृतिक मुत्सद्दीगिरी यासारख्या क्षेत्रात देशाची रणनीती बनवण्याच्या दिशेने त्यांनी बरेच काम केले आहे. त्या युक्रेनियन महिला काँग्रेसच्या सक्रिय सदस्यही होत्या.