कीव : Russia Ukraine War News : युक्रेन लवकरच युरोपियन युनियनचा (European Union) सदस्य होण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला आहे. या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला संबोधित केले. आजची सकाळी सर्वात भयानक होती, असे आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणात सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेन लवकरच युरोपियन युनियनचा सदस्य होणार आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला आहे. यामुळे आता युक्रेनचा नाटोचा सदस्य होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. मात्र रशिय़ा आणि युक्रेनचा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


युक्रेनची जनता आपल्या जीवाची बाजी लावून संघर्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्यात हजारो नागरिकांनी जीव गमावला असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लहान मुलांनाही सोडलेले नाही, अशी टीका त्यांनी आपल्या भाषणात केली. 



आपल्याला एकटे सोडणार नाही, याची युरोपियन युनियनकडून ग्वाही हवी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. युरोपिनयन देशांच्या प्रतिनिधींनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून झेलेन्स्कींचे कौतुक केलं. 


दरम्यान, रशियाच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटलेय, आता आम्‍ही आमचे उद्‍दिष्‍ट्य साध्‍य होईपर्यंत युक्रेनवर हल्‍ले करतच राहणार आहे. तर रशियाच्‍या परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, अमेरिकेने सर्वप्रथम युरोपमधील अणवस्‍त्र नष्‍ट करावीत. आम्‍ही आता आमचे उद्‍दिष्‍ट्य साध्‍य केल्‍याशिवाय थांबणार नाही, असे रशियाने म्हटले आहे.


रशियाने युद्धाबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. युद्धाचा आज सहावा दिवस आहे. आणखी एका शहरावर रशियाने ताबा मिळविल्याचे दावा केला आहे.


 दरम्‍यान, रशिया-युक्रेन युद्‍धासंदर्भात संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेच्‍या आपत्तकालीन बैठकीत प्रतिवादी पक्षाला 29 मते पडली. या मतदानात भारतासह अन्‍य 13 देशांनी भाग घेतलेला नाही.