नवी दिल्ली Russia Ukraine war : युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी युक्रेन सैन्यावर केलाय. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (Indian students in Ukraine) असुरक्षित असून, खारकीव्हमध्ये मोठ्या संख्येनं भारतीनं विद्यार्थ्यांना आडवून ठेवत त्यांना बंधक बनवल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह युद्धजन्यस्थितीबाबत माहिती देताना पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) फोनवरून माहिती दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रशिया युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने कंबर कसली आहे. यासाठी भारताने ऑपरेशन गंगा लॉंच (Operation Ganga Latest News) केले आहे. आतापर्यंत 3000 हून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे.


दरम्यान, युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. युद्धजन्य परिस्थितीबाबत बोलताना पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना फोनवरून ही माहिती दिली.


खारकिव्हमधून भारतीय रशियामार्गे मायदेशी परतणार 


भारतीयांना खारकिव्हमधून बाहेर पडता यावं यासाठी रशियाने भारताला संपूर्ण सहकार्य दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना रशियाबाहेर पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यांचे आश्वासन दिले आहे. 


भारतीयांसाठी युद्धजन्य स्थितीतही रशिया सेफ पॅसेज निर्माण करेल असे पुतीन यांनी मोदी यांना आश्वासन दिले आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे समूह खारकिव्हमधून बाहेर पडावे यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे समूह रशियाकडे नेण्याचा प्रस्तावही रशियाने दिला आहे. 


सध्या भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिम सीमांकडे जात आहेत. मात्र आता ईशान्येला असलेल्या रशियाच्या सीमेकडेही भारतीय विद्यार्थ्यांना युद्धजन्य स्थितीत सुरक्षितरित्या नेण्याचा पर्याय रशियाने भारतासमोर ठेवला आहे. रशियाने पुतीन मोदी चर्चेनंतर हे निवेदन जारी केलंय