कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलं आहे. यानिमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. 2022 मध्ये काय काय घडेल याचं भाकीत त्यानं कित्येक वर्षांपूर्वीच केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवली आहे. कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस्. 15व्या शतकात फ्रान्समध्ये जन्मलेल्या नॉस्ट्रॅडॅमनं 2022 मध्ये काय घडणार याविषयी अनेक भाकितं केली होती. त्यातली त्याची पहिली भविष्यवाणी खरी ठरली. 



रशिया आणि युक्रेनच्या युद्धात सारं जग होरपळण्याची चिन्ह आहेत. त्यानं आणखी एक भाकित केलं होतं सोनं-चांदी महाग होईल. जगभरात महागाईचा भस्मासूर माजेल. अमेरिकन डॉलरचं मुल्य घसरेल..त्याची ही भाकितही खरी होताना दिसत आहे.


नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं. कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकितं खरी ठरली आहेत. जगात महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं. पाहूयात 2022 मध्ये आणखी काय का होईल. 


अणुबॉम्ब हल्ल्यानं वातावरणात मोठे बदल होतील. जगभरात सलग तीन दिवस अंधार पडेल. मोठ्या प्रमाणात उल्कापात होऊन समुद्रात विनाशकारी लाटा उसळली. 


समुद्राचं पाणी किना-यालगतच्या शहरात घुसून प्रचंड हानी होईल. याशिवाय फ्रान्समध्ये भीषण वादळ येईल. ज्यामुळे पूर, आग आणि दुष्काळ या तीन संकटांचा सामना करावा लागेल. माणसानं तयार केलेला रोबो त्याच्याच जीवावर उठेल असंही भाकित नॉस्ट्रॅडॅमसनं केलंय. भूमध्य सागरात क्षेपणास्त्रांच्या परीक्षणावेळी मोठे स्फोट होतील असंही त्यानं म्हंटलंय. 


2020 पासून आलेली कोरोनाची लाट, रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई या सगळ्या घडामोडी पाहता नॉस्ट्रॅडॅमसचं भविष्य तंतोतंत ठरताना दिसतंय. त्यामुळे आता त्यानं वर्तवलेलं पुढचं भविष्यही खरोखर ठरणार का? या चिंतेनं सा-या जगाला ग्रासलं आहे.