मास्को : Russia Ukraine War: एकीकडे बेलारुसमध्ये युक्रेन आणि रशियाची शांतीचर्चा सुरू असताना दुसरीकडे रशियाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. (Russia Ukraine Conflict) राजधानी कीव हे शहर रिकामे करा, असा निर्वाणीचा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. कीवच्या रहिवाशांनी लवकरात लवकर शहर रिकामं करावं. नागरिकांना कुठलाही त्रास दिला जाणार नाही, त्यांना सुरक्षित शहराबाहेर पडू दिले जाईल, असे रशियन फौजांनी स्पष्ट केले आहे. सध्या कीव शहराला रशियन सैन्याने पूर्णपणे घेरले आहे. (Russia warns Ukraine again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. खरे तर रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच रस्त्यावर उतरली आहे. रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियाच्या डिटरेन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगात अस्वस्थता वाढली आहे. मात्र, आतापर्यंत अमेरिकेने असे कोणतेही पाऊल उचललेले नाही, ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे आधीच सुरू असलेला जागतिक तणाव आणखी वाढला असून, लवकरच अमेरिकाही प्रत्युत्तर देईल, अशी भीती व्यक्त होत आहे.


रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध एक ते दोन दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. मात्र रशिया युक्रेन यांच्यातले युद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच पेटत चालले आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले खरे. मात्र त्यांना युक्रेनच्या फौजांसह अनपेक्षित गुप्त सेनेचा सामना करावा लागतोय. या धक्कातंत्रामुळे रशियाला युक्रेनसोबतचा लढा जरा जिकिरीचा ठरत आहे. कारण थेट जुक्रेनची जनताच आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलीय. रशियन फौजा शहरात घुसल्यावर त्यांचा मुकाबला करण्यासाठी जनतेने जागोजागी रस्ते खोदून बंकर उभे केलेत.