मास्को : Russia-Ukraine War Updates: रशियन सैन्याने (Russian Forces) युक्रेनच्या चेर्नोबिल अणुभट्टीवर (Chernobyl Nuclear Power Plant) कब्जा केला आहे. राजधानी कीव्हपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध चेर्नोबिल अणुभट्टी रशियन सैनिकांनी ताब्यात घेतली आहे. (Russian Forces Capture Chernobyl Nuclear Power Plant, Says Ukrainian PM)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1986 मध्ये चेर्नोबिल अणुभट्टी भीषण स्फोट झाला होता. सध्या ही अणुभट्टी बंद आहे. स्फोट झालेल्या प्लँटवर प्रोटेक्टिव्ह कव्हर लावण्यात आलंय. या कव्हरमुळे रेडिएशन परिसरात पसरत नाही. मात्र आता रशियन सैनिकांनी या अणुभट्टीचा ताबा घेतल्याने ही अणुभट्टी पुन्हा धोक्यात आली आहे. 


संपूर्ण युरोपला याचा धोका होऊ शकतो. नाटो फौजांना युक्रेनमध्ये न येण्याचा इशारा देण्यासाठी ही अणुभट्टी ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. 



दरम्यान, युक्रेनेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. (Ukraine says it shot down a Russian aircraft) युक्रेनने रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावाही केला आहे. तसेच 7 हेलिकॉप्टर्स पाडल्याचाही दावा केलाय. रशियाचे 30 रणगाडेही उध्वस्त केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.