कीव : Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशिया माघार घेण्याच्या स्थितीत नाही. मात्र, असे असताना युक्रेनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसा दावा युक्रेनने केला आहे. (Ukraine says it shot down a Russian aircraft) युक्रेनने रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावाही केला आहे. तसेच 7 हेलिकॉप्टर्स पाडल्याचाही दावा केलाय. रशियाचे 30 रणगाडेही उध्वस्त केल्याचा दावा युक्रेनने केलाय. (Strong attack from Ukraine, killing 800 Russian soldiers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रशियाने हल्ला केल्यावर य़ुक्रेनने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केलीय. त्यात रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र, युक्रेन एकटा पडला आहे. बलाढ्य अमेरिकाने ऐनवेळी युक्रेनच्या पाठिशी राहिला नाही. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेनं रशियात सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे.



दरम्यान, रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियावर आर्थिक निर्बध लादलेत. तसेच G7 च्या नेत्यांची भेट घेऊन अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसह रशियावर कठोर निर्बंध लादणार असल्याचं सागितले आहे. जर रशियाने अमेरिकेवर सायबर हल्ला केला तर त्याला अमेरिका चोख उत्तर देईल असा इशाराही बायडेन यांनी दिला आहे.