Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनदरम्यान गेले दीड महिने युद्ध सुरु असून या युद्धात युक्रेनची मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवित हानी झाली आहे. हल्ल्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. आपल्या डोळ्यात देखत आपली जीवाभावाची माणसं मरताना पहावं लागतंय. युक्रेनमध्ये आता उरलीय ती वेदना आणि भीषणता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच दरम्यान युक्रेनमधल्या एका चिमुरडीने हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या आईला लिहिलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून या पत्राने संपूर्ण जग हळहळलंय. 


प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु आणणारं पत्र
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. हजारो बालकं अनाथ झाली. अशाच एका अनाथ झालेल्या मुलीने युद्धात आपल्या आईला गमावलं. आपल्या आईसाठी 9 वर्षांच्या या मुलीने पत्र लिहिलं आहे. मी एक चांगली मुलगी होण्यासाठी प्रयत्न करेन, जेणेकरुन आपण पुन्हा स्वर्गात भेटू, असं या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. 


या मुलीचं पत्र युक्रेनचे गृहमंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी ट्विटरवर शेअर केलं असून, त्यात त्यांनी लिहिलंय हे शब्द मला रडवायला पुरेसे आहेत. 'लढण्याने केवळ श्वास हिरावून घेतला जात नाही, तर लढा जगण्याची आशाही हिरावून घेतो' हे सांगण्यासाठी या मुलीचं पत्र पुरेसं आहे.


बोरोड्यांका इथल्या हल्ल्यात मुलीच्या आईचा मृत्यू
युक्रेनच्या बोरोद्यांका शहरात रशियन सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात 9 वर्षांच्या मुलीची आई मृत्यूमुखी पडली. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, चिमुरडीच्या आईच्या कारवर हल्ला करण्यात आला, त्यात तिचा मृत्यू झाला.


पत्रात काय लिहिलंय?
9 वर्षाच्या मुलीने आपल्या आईला पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने म्हटलंय, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम 9 वर्षांसाठी धन्यवाद. मला सुंदर बालपण दिल्याबद्दल मी तूझी खूप आभारी आहे. तू जगातील सर्वोत्तम आई आहेस. मी तुला कधीही विसरणार नाही. तू स्वर्गात खूप आनंदी राहवं अशी माझी इच्छा आहे. तू स्वर्गात जावंस अशी माझी इच्छा आहे. आपण स्वर्गात भेटू. मी स्वर्गात जाण्यासाठी एक चांगली मुलगी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. खूप प्रेम, तुझी गलिया... 


युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न 
युद्धाने युक्रेनमधल्या हजारो लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. रशियाचे आमच्यावर हल्ले सुरुच असून रशियावर युद्ध संपवण्यासाठी दबाव आणण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलं.  त्याचवेळी, पूर्व युक्रेनमध्ये तीव्र होत चाललेली लढाई लक्षात घेत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगभरातील देशांना अधिक शस्त्रे पाठवण्याचं आवाहन केलं आहे.