Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब  टाकल्याचा दावा (Vacuum bomb) युक्रेनच्या नेत्यानं केलाय. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केलाय. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब (Father of All Bomb) असं म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय?
व्हॅक्यूम बॉम्ब हे थर्मोबॅरिक शस्त्र (thermobaric weapon) आहे. थर्मोबॅरिक शस्त्रांमध्ये गनपावडरचा वापर केला जात नाही. त्याऐवजी, व्हॅक्यूम बॉम्ब उच्च-दाबाच्या स्फोटकांनी भरलेले असतात. व्हॅक्यूम बॉम्ब सभोवतालच्या वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतात आणि शक्तिशाली स्फोट घडवून आणतात. व्हॅक्यूम बॉम्ब इतका भयानक आहे, की तो फुटल्यास 300 मिटर परिसरात प्रचंड हानी होऊ शकते. या बॉम्बमुळे रेडिएशनचा जरी धोका नसला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.


व्हॅक्यूम बॉम्ब प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरी (शॉकवेव्ह) उत्सर्जित करते, ज्यामुळे विनाशाची पातळी वाढते. व्हॅक्यूम बॉम्ब 44 टन टीएनटीच्या शक्तीने विस्फोट करण्यास सक्षम आहे.  व्हॅक्यूम बॉम्बला 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' (Father of all Bomb) असंही म्हटलं जातं. रशियाने 2016 मध्ये सीरियावर या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.


रशियाने 2007 मध्ये व्हॅक्यूम बॉम्ब विकसित केला होता. त्याचे वजन 7100 किलो आहे. अमेरिकेकडेही असाच बॉम्ब आहे ज्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब (Mother of all Bomb) म्हणतात. 11 टन टीएनटीच्या शक्तीने त्याचा स्फोट होऊ शकतो. त्याचं नाव GBU-43/B आहे.


क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
क्लस्टर बॉम्ब (cluster bombs) अतिशय धोकादायक मानले जातात. कारण यामध्ये मुख्य बॉम्बमधून अनेक लहान स्फोटकं (Mini Bomb) सोडली जातात. या लहान स्फोटकांमुळे निश्चित केलेल्या लक्षाच्या आसपासच्या भागातही मोठं नुकसान होतं.  मुख्य बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर यातून निघणारी छोटी स्फोटकं दीर्घकाळ पडून राहू शकतात. अशा परिस्थितीत युद्ध संपल्यानंतरही या बॉम्बचा फटका बसण्याची शक्यता वाढते.