नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावामुळे निर्माण झालेल्या अस्थितरतेमुळे सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. गेल्या 7 दिवसापासून सोन्याचे दर प्रति तोळा गगनाला भिडले आहेत. आज तब्बल 1 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या भाव वाढल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडलं आहे. आज सोन्याचे भाव हे 52 हजार 200 प्रति तोळे असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली.



आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 99 डॉलर प्रतिबॅरलवर जाऊन पोहोचले आहेत. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरानं मोठी उसळी घेतली आहे. सप्टेंबर 2014नंतर प्रथमच कच्च तेल 100 डॉलरच्या घरात पोहोचलं आहे. 


विशेष म्हणजे कच्चं तेल गगनाला भिडलं असताना देशात गेल्या 3 महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात एकदाही वाढ करण्यात आलेली नाही. कारण अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. मात्र निवडणुका संपल्यावर मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


सोन्याचा भाव प्रतितोळा 52 हजार 200 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. युक्रेन-रशिया तणावामुळे सलग सातव्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोनं महागल्यामुळे लग्नघरांचं बजेट मात्र कोलमडलंय. 


शेअर बाजारात मंदी असल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. परिणामी सराफ बाजार सध्या तेजीत आहेत.  सोने हे खूप महत्वाचे असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडमोडीचा परिणाम थेट सोन्यावर होत असून ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी चा सूर आहे. अनेक ग्राहक हे संभ्रमावस्थेत असल्याने हवी तेवढी खरेदी करत नसल्याचे दिसत आहे.