मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका कपलमध्ये खूप मोठा वाद झाला. हे भांडण इतक्या विकोपाला गेलं की पुढे जे झालं त्याचा कुणीच विचार केला नसेल. 


सेंट पीटर्सबर्गमधील प्रकरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील एक कपल बाल्कनीतून चक्क खाली कोसळलं आहे. हे कपल बाल्कनीतून उभं राहून मोठ मोठ्याने वाद करत होते. अशावेळी हे दोघं वादात इतके गुंतले होते की, चक्क 25 फूट उंचीवरून खाली कोसळले आहेत. दिलासादायक बातमी अशी की, या दोघांना गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांचा जीव वाचला. सध्या या दोघांना रूग्णालयात दाखल केलं. 



बाल्कनीच्या 25 फुटावरून कपल खाली 


सेंटर पीटर्सबर्गमध्ये राहणाऱ्या ओल्गा वोल्को आणि त्याची पत्नी येवगेनी कार्लगीमध्ये यांच्याच कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला. दोघं वाद करता करता हे दोघं बाल्कनीत आले. यांच्यात अगदी हाणामारी देखील झाली. वाद करता करता दोघांचा धक्का रेलिंगला लागला. त्यावेळी रेलिंग तुटली. दोघं जवळपास 25 फूट खाली कोसळले. 


सोशल मीडियावर असे अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. पण या व्हीडिओने सगळ्यांना स्तब्ध केलं आहे. वाद इतका विकोपाला गेलाय की, यामध्ये दोघांचा जीव ही जाऊ शकत होता.