जन्मावेळी मृत्यू झाल्याचे समजून सोडलेला मुलगा ७ वर्षांनी भेटला
कधी कधी जीवन अशा वळणावर आणून सोडतं की, त्यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अनुभव रशियातील वोल्वोग्राड शहरातील एका दांम्पत्याला आला.
रशिया : कधी कधी जीवन अशा वळणावर आणून सोडतं की, त्यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अनुभव रशियातील वोल्वोग्राड शहरातील एका दांम्पत्याला आला.
सीन १ - बाळाचा जन्म
झालं असं की, २०११ मध्ये एका महिलेले एका मुलाला जन्म दिला. बाळ जास्त आजारी होतं. बाळ वाचणार नाही, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवायला हवं, असं डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. मनावर दगड ठेवून आई-वडिल घरी निघून गेले. पाच दिवसांनी बाळाचं तब्येत बघण्यासाठी दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना सांगितलं गेलं की, डॉक्टरांच्या लाख प्रयत्नांनंतरही बाळाला वाचवता आलं नाही. दोघांवरही दु:खाचा डोंगर कोसळला. काही काळाने त्यांनी स्वत:ला सांभाळलं आणि त्यांनी नवीन आयुष्य सुरू केलं.
सीन २ - सात वर्षांनी घडलं हे...
या घटनेच्या तब्बल सात वर्षांनी महिलेला तिच्या एका जुन्या अकाऊंटची आठवण झाली. त्याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर तिला कळले की, तिचं अकाऊंट खूपआधीच लॉक करण्यात आलं. आणखी माहिती काढल्यावर त्यांना कळलं की, त्यांच्यावर साधारण अडीच लाख रूपयांचं बिल शिल्लक आहे. त्यांना सांगण्यात आलं की हे अनाथालयाचं बिल आहे. आधी तर त्यांना काही कळलं नाही. पण त्यांना नंतर सांगण्यात आलं की, त्यांचं बाळ अनाथालयात वाढत आहे. हे बिल त्याच अनाथालयाला द्यायचं आहे. हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
सीन ३ - अकाऊंट का लॉक केलं?
दरम्यानच्या काळात महिलाने आपलं घर बदलल्याने अनाथालय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण जेव्हा हॉस्पिटलने त्या मुलाला अनाथालयाला दिले होते, तेव्हा त्यांनी महिलेच्या घराच्या पत्त्यासहीत तिचे बॅंक डिटेल्स सुद्धा दिले होते. त्यानंतर अनाथालयाने बिल पेमेंटसाठी पोलीस आणि बॅंकेकडे संपर्क साधला होता. घर बदलल्याने महिलेचा पत्ता पोलिसांना मिळाला नसल्याने प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाच्या निर्णयानुसार महिलेचं बॅंक अकाऊंट लॉक केलं गेलं.
सीन ४ - दाम्पत्याला मुलगा मिळाला...
मुलगा जिवंत असल्याची माहिती मिळताच दांम्पत्याने जराही वेळ न घालवता अनाथालय गाठलं. इथे मुलाच्या जन्मानंतर त्यांची पहिली भेट झाली. मेडिकल टेस्ट केल्यावर मुलगा त्यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मुलाला ताब्यात घेण्यासाठी दाम्पत्य कोर्टात गेलं. न्यायाधीशांनीही जराही वेळ न घालवता मुलाला त्यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले. नंतर दाम्पत्याने चुकीची माहिती देणा-या हॉस्पिटलवर केस केली. आता ते हॉस्पिटल दाम्पत्याला चुकीची माहिती का दिली गेली? अनाथालयाचे बिल त्यांच्या नावावर का आले? या प्रश्नांचे उत्तर शोधत आहे.