Russian President Putin: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाला 11 महिने पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, अद्यापही हे युद्ध सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. या युद्धात (Russia Ukraine War) मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाल्याचं दिसतंय. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या जगभरात व्लादिमीर पुतिन यांचं कौतूक होताना दिसतंय. (Russian president Vladimir Putin has called for  36 hour ceasefire marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्लादिमीर पुतिन यांनी (Vladimir Putin has called for ceasefire) आपल्या सैनिकांना मोठा आदेश दिला आहे. पुतिन यांनी लष्कराला 6 जानेवारीच्या दुपारपासून 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत युक्रेनमध्ये 36 तासांचा युद्धविराम पाळण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी हा निर्णय रशियन आध्यात्मिक नेता पॅट्रिआर्क किरिल (Dmytro Kuleba) यांच्या विनंतीवरून घेतला आहे. पॅट्रिआर्क किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदीची विनंती केली होती.


युक्रेन आणि रशियामध्ये राहणाऱ्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांकडून (Orthodox Christmas) ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्यांच्यासाठी हा एक मोठा सण आहे. गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान पहिल्यांदाच दोन्ही बाजूंकडून 36 तास शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी, जेव्हा युद्ध सुरू झाले, त्यावेळी कॉरिडॉर उघडण्यात आले होते. ज्यामुळे सामान्य लोक युद्ध क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकत होते. 


आणखी वाचा - Porn University : या विद्यापीठात दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे


दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी एकत्रितपणे यावर एकमत झालं आणि लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. या युद्धात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. भारताने दोन्ही देशांना अनेकदा हे युद्ध (Russia Ukraine War) संपवण्याचे आवाहन केलं होतं.