नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातून टीका होत असताना आता रशियाने चीनला आणखी एक झटका दिला आहे. चीनला देण्यात येणाऱ्या एस 400 क्षेपणास्त्राचे वितरण रशियाने स्थगित केले आहे. विशेष म्हणजे हा सौदा स्थगित केल्यानंतर चिनी माध्यमांनी तो वेगळ्या पद्धतीने सादर केला आणि रशियाला हवालदिल असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्था एएनआयच्या एका वृत्तानुसार, रशियन मीडिया एजन्सीए यूएवायरने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने अशी घोषणा केली आहे की सध्या त्याने एस -400 क्षेपणास्त्र यंत्रणा चीनला देण्यास नकार दिला आहे.


रशियाने क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित केल्यावर चिनी वृत्तपत्र सोहोने चीनच्या वतीने प्रतिक्रिया देत म्हटलं की, रशियाने नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे. कारण कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या चीनी कम्युनिस्ट पक्षाचं यावरुन लक्ष्य विचलित होऊ नये.


वृत्तपत्रात असेही म्हटले आहे की, ही प्रक्रिया जटिल आहे, तसेच रशियाला आपले बरेच तांत्रिक कर्मचारी बीजिंगला पाठवावे लागतील आणि कोरोना युगात हे एक अतिशय कठीण काम आहे.


अलीकडे मॉस्कोवर बीजिंगची हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यावर रशियाने हा करार स्थगित केला आहे. चीनला गोपनीय सामग्री सोपविल्याबद्दल सेंट पीटर्सबर्ग आर्कटिक सोशल सायन्स अॅकॅडमीचे अध्यक्ष वालेरी मिट्को या रशियन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.


एस 400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा काय आहे:
एस 400 क्षेपणास्त्र यंत्रणा ही एस 300 ची अद्ययावत आवृत्ती आहे. हे 400 किमीच्या परिघात येणारी कोणतीही विमान किंवा शस्त्रे नष्ट करू शकते. चीनने त्याच्या खरेदीसाठी 2014 मध्ये रशियाबरोबर करार केला होता.


कोरोना विषाणूमुळे चीनला टीकेचा सामना करावा लागत आहे. तर जगातील अनेक देश देखील चीन विरूद्ध कारवाई करत आहेत. परिस्थिती अशी आहे की अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी म्हटले की, अमेरिकेला चीनविरूद्ध जागतिक युती तयार करायची आहे.'


अमेरिका सुरुवातीपासूनच चीनवर टीका करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला मुख्य प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं आहे. चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या विषयाची माहिती लपवल्याचा आरोप केला. ट्रम्प कोरोना महामारीला 'चिनी प्लेग' म्हणत आहेत. व्यापारावरुन देखील अमेरिकेचा चीनवर राग आहे.


दुसरीकडे, कोरोना व्हायरस आणि हाँगकाँगमुळे ब्रिटनने चीनविरूद्ध आपली भूमिका कडक केली आहे. अलीकडेच ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी चीनी कंपनी हुआवेईवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांचा असा आरोप होता की ब्रिटनचा सर्व डेटा चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात जाऊ शकतो.