कीव : Russia Ukraine War : युक्रेन युद्धात मानवी जीवनाची अपरिमित हानी होत आहे. या युद्धात अतिसंहारक अस्त्र वापरली जात असल्याचा आरोप होत आहे. (Russia's most lethal weapons on Ukraine) आता रशियाने युक्रेनवर फॉस्फरस बॉम्बचा मारा केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. विशेष म्हणजे हा फॉस्फरस बॉम्ब लष्करावर नाही तर मानवी वस्तीवर फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Russia drops white phosphorus bomb on Ukraine)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनवर रशिया एकेक अतिसंहारक अस्त्रांचा मारा करत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर शक्तिशाली व्हॅक्युम बॉम्बचा मारा केल्याचा आरोप झाला होता. आता तसाच अतिसंहारकव्हाइट फॉस्फरस बॉम्बही रात्रीच्या वेळी टाकल्याचा आरोप करण्यात आलाय. तब्बल 800 अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण करणारा हा बॉम्ब फुटला तर परिसरातही माणसे क्षणात वितळून जातात. या बॉम्बचा वापर नागरी वस्तीवर केल्याचा युक्रेनचा आरोप आहे. 


रशियाच्या डोनबासमधील लुहान्स्कजवळील पोपोस्ना या शहरावर या बॉम्बचा मारा झाल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्या लुडमिला डेनिसोव्हा यांनी केला आहे.व्हाइट फॉस्फरस बॉम्बला अतिसंहारक अस्त्र मानले जाते. 


ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर फॉस्फरस वेगाने जळते. युद्धात हा बॉम्ब धूर तयार करण्यासाठी होतो. युद्धात याच्या वापराला बंदी नाही. पण मानवी वस्त्यांवर याचा वापर करण्यास रोम करारानुसार बंदी आहे. जळणा-याव्हाइट फॉस्फरसमुळे 800 अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता तयार होते. या बॉम्बच्या स्फोटाने तयार झालेले लाखो कण ऑक्सिजनचा वापर करत दूर आणि उष्णता निर्माण करतात. या स्फोटामुळे आणि अतिउष्णतेमुळे माणसाचे शरीर क्षणात वितळून जाते. याचा फैलाव कित्येक किलोमीटरपर्यंत होतो. जोवरव्हाइट ऑक्सिजन किंवा परिसरातला ऑक्सिजन जळून जात नाही तोवर ही आग धुमसत राहते. 


रशियाने फेकलेल्या या बॉम्बचे काही फोटोग्राफ लुडविना यांनी जारी केलेत. मात्र यामुळे पोपोस्ना शहरात नेमकी किती हानी झाली याची मात्र माहिती उघड झालेली नाही. अशा अस्त्रांचा वापर आता सुरू झाला आहे. मानवी जीवनाची राखरांगोळी करणारे हे युद्ध आता थांबणं गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.