दुर्मिळ पांढऱ्या जिराफाच्या मादीची पिलासह शिकार
अतिशय दुर्मिळ अशी ही प्रजाती धोक्यात
मुंबई : पृथ्वीवर असणाऱ्या विविध अन्नसाखळ्या आणि सजीव प्रजातींमध्ये काही प्राण्यांच्या प्रजाती या अतिशय दुर्मिळ आहेत. ज्यांच्या संवर्धनासाठी आणि जीवसृष्टीचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत. पण, प्राणीमात्रांच्या संवर्धनांसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी म्हणून झटणाऱ्यांचे हे प्रयत्नही आता व्यर्थ जात असल्याचं चित्र आहे.
प्रयत्न अपयशी ठरण्याचं कारण म्हणजे, अतिशय दुर्मिळ अशा समजल्या जाणाऱ्या white giraffe पांढऱ्या जिराफांच्या प्रजातीतीत मादी आणि तिच्या पिलाची केनियामध्ये शिकार करण्यात आली आहे. परिणामी आता केनियातील इशाकबिनी हिरोला कन्झर्वेन्सीमध्ये फक्त एक पांढरा नर जिराफच शिल्लक राहिला आहे.
Kenya wildlife sanctuary केन्याच्या अभयारण्यामध्ये जिराफांच्या सांगाड्यांचेच अवशेष सापडले. मादी जिराफ बऱ्याच काळापासून न दिसल्यामुळे अभयारण्याकडून संबंधित व्यक्तींना याविषय़ीची माहिती देण्यात आली. ज्यानंतर हाडांचे अवशेष सापडताच या सर्व प्रकाराविषयी इजारा समुदायाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
'हा Ijara (समुदाय) आणि केनियासाठी अत्यंत वाईट दिवस आहे. कारण आम्ही असा एकमेव समुदाय होतो जो या पांढऱ्या जिराफांचे संरक्षणकर्ते म्हणून ओळखलो जायचो' असं म्हणत, केन्यातील गारिस्सा कंट्री येथील अभयारण्य व्यवस्थापक मोहम्मद अहमदनूर यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं.
...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
दरम्यान, सध्या या प्रकरणीचा तपास सुरु करण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाची ही जिराफ मादी २०१७मध्ये सर्वांचं लक्ष वेधून गेली. जेव्हा तिला नरासह पाहण्यात आलं मागोमाग पांढऱ्या जिराफाच्या पिलानेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या अभारण्यात पांढऱ्या जिराफांचं हे कुटुंब मुक्त संचार करत होतं, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषयही ठरत होतं. पण, आता मात्र मादी जिराफ आणि तिच्या पिलाची शिकाऱ्यांनी शिकार केल्यामुळे एक दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्याच मार्गावर पोहोचल्याचं दाहक वास्तव समोर येत आहे.