अंतराळात विनाशकारी वेगाने फिरतोय ब्लॅक होल; बदलू शकतो स्पेस टाइम
चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ने हा ब्लॅक होल शोधला आहे. हा ब्लॅक होल अंतराळात विनाशकारी वेगाने फिरत आहे.
Sagittarius A Black Hole: कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल हे अंतराळातील सर्वात मोठ रहस्य आहे. आपल्या आकाशगंगेत असाच एक रहस्यमयी ब्लॅक होल आहे. हा ब्लॅक होल विनाशकारी वेगाने फिरत आहे. या ब्लॅक होलची फिरण्याची गती पाहता स्पेस टाइम बदलू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे.
सॅजिटेरियस ए (Sagittarius A) असे या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे नाव आहे. हा ब्लॅक होल पृथ्वीपासून 26,000 प्रकाशवर्ष दूर आहे. नासाच्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ने हा ब्लॅक होल शोधला आहे. चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ही एक विशिष्ट प्रकारची दुर्बिण आहे. अंतराळातील ओब्जेक्टचे निरीक्षण करण्याचे काम ही दुर्बिण करते. अंतराळातील उष्ण प्रदेशातील क्ष-किरण उत्सर्जनाचे या दुर्बिणच्या माध्यमातून निरीक्षण केले जाते. रेडिओ लहरी आणि एक्स-रे उत्सर्जन यांच्या निरीक्षणातून चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीने हा ब्लॅक होल शोधला आहे. याला Accretion Disk असे म्हणतात. 21 ऑक्टोबर रोजी रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या अहवालात या ब्लॅक होलच्या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे.
ब्लॅक होल स्पेस टाईम खेचतोय
हा ब्लॅक होल विनाशकारी वेगाने फिरत आहे. हा ब्लॅक होल स्पेस टाईम खेचत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक रुथ डेली यांनी याबाबत माहिती दिली. याचा कोणताही परिणाम इतर ग्रह ताऱ्यांवर होणार नाही. मात्र, या ब्लॅक होलच्या फिरण्याच्या गतीचा अभ्यास हा भविष्यातील संशोधनासाठी दिशादर्शक ठरू शकतो.
सूर्यापेक्षा 70 पट मठ्या आकाराचा कृष्णविवर
सूर्यापेक्षा 70 पट मठ्या आकाराच्या कृष्णविवराचा शोध खगोल शास्त्रज्ञांना लागला. तारे ग्रह, कसे निर्माण झालेया या बद्दलच्या सिद्धांताला यामुळे आव्हान मिळालंय. नॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ चायनाच्या खगोल शास्त्रज्ञंनी हे कृष्णविवर शोधून काढलंय. या कृष्ण विवराचं नाव एलबी-1 असं ठेवण्यात आलंय. ते पृथ्वीपासून 15 हजार प्रकाशवर्षे दूर आहे.