मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तालिबान बंडखोरांनी रविवारी मध्यरात्री सरकार स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. पूर्वी ज्यांनी तालिबानींचा कहर पाहिला आहे ते या परिस्थितीमुळे भयभीत झाले आहेत. हे कृत्य करण्यासाठी तालिबाकडे इतकी शक्ती आणि पैसा नक्की कोण पुरवतं? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. तर जाणून घेवू अफाट पैसा आणि शक्ती तालिबानकडे कशी? ज्यामुळे  अफगाणिस्तान सरकारचे अस्तित्व संपुष्टात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानकडे किती पैसे आहेत आणि ते किती पैसे खर्च करतात याबद्दल अद्याप कोणालही माहिती नाही.  पण संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार तालिबानच्या वर्षाची कमाई तब्बल 1.6 बिलियन डॉलरपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. 10 वर्षांपूर्वी तालिबानची कमाई 300 डॉलर इतकी होती. ज्यामध्ये आता 5 पटीने वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


वॉइस ऑफ अमेरिकेच्या बातमीनुसार, जून 2021 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की तालिबान गुन्हेगारी कारवायांद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. यामध्ये अफू उत्पादन, मादक पदार्थांची तस्करी, खंडणी यांसारख्या कामांचा समावेश आहे. गेल्या वर्षी तालिबानने ड्रग्ज तस्करीवर 460 दशलक्ष डॉलर्स कमावले.


अमेरिकेच्या सांगण्यानुसार, रूसने तालिबानला फक्त हत्यारे पुरवली नाहीत, तर हत्यारे चालविण्यासाठी प्रशिक्षण देखील दिलं. अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याचे कमांडर असलेले जनरल जॉन निकोलसन यांनी मॉस्कोवर उघडपणे आरोप केले होते. एवढंच नाही तर काही अन्य विश्लेषकांचे म्हणणे आहे की तालिबानला पाकिस्तान आणि इराणकडूनही आर्थिक मदत मिळते.
 
शिवाय तालिबान नेत्यांनाही भरपूर देणग्या मिळतात. यामध्ये श्रीमंत समर्थक आणि अनेक संस्था सहभागी आहेत. जे दरवर्षी या कट्टरपंथी इस्लामी गटाला मोठ्या प्रमाणात पैसे दान करतात. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये, अफगाणिस्तान सरकारने 11 अब्ज डॉलर्स (8 ट्रिलियन रुपये) खर्च केले, त्यापैकी 80 टक्के परदेशी मदतीतून आले. म्हणजेच सरकारकडे फक्त 2 ट्रिलियन रुपयांचे पैसे होते. तर तालिबानने एका वर्षातच 1.25 ट्रिलियन रुपयांहून अधिक गोळा केले.