Sana ramchand gulwani: पाकिस्तानात `या` हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट
India Pakistan : पाकिस्तानात मोठ्या संख्येनं हिंदू लोकवस्ती पाहायला मिळते. यातील अनेकजण सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ही महिलासुद्धा तेथील अशाच हिंदूंपैकी एक.
Sana ramchand gulwani: भारत आणि पाकिस्तान (India pakistan) या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी बरंच बोललं आणि लिहिलं गेलं आहे. हीच दोन्ही राष्ट्र आता पुन्हा एकदा एका नव्या कारणामुळं चर्चेत आली आहेत. कारण, शेजारी राष्ट्रात म्हणजेच पाकिस्तानात 27 वर्षीय हिंदू महिलेनं इतिहास रचला आहे. ज्यामुळं तिच्यावर तेथील हिंदू समुदायासोबतच भारतातूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आता तुम्ही म्हणाल असं, या महिलेनं केलं तरी काय?
1947 पासून आतापर्यंत कुणीही पाकिस्तानी हिंदू महिला जी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेली नाही तिच परीक्षा ही महिला उत्तीर्ण झाली आणि तिनं Assistant Commissioner या पदाचा पदभार स्वीकारला. आईवडिलांची इच्छा पूर्ण करणाऱ्या या महिलेचं नाव आहे, डॉक्टर सना रामचंद गुलवानी (who is Sana ramchand gulwani? ).
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहणाऱ्या सनानं सेंट्रल सुपीरियर सर्विसेस (CSS) परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं. स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार तिनं अटक जिल्ह्यातील हसनअब्दाल हरामध्ये सहायक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. कौतुकाची बाब म्हणजे तिनं पहिल्यांदाच परीक्षा देत ही किमया केली. फाळणीनंतर ही परीक्षा उत्तीर्ण होणारी सना पहिलीची महिला असल्याचं म्हणत स्थानिक हिंदू समुदायाकडून तिचं कौतुक केलं जात आहे.
सनाविषयीची खास माहिती
सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर नोकरीसाठी रुजू झालेल्या सनानं मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीतून MBBS पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतरही तिनं शिक्षण सुरुच ठेवलं. Urologist म्हणून ती पुढं शिकली. ज्यानंतर तिनं स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात उडी मारली.
हेसुद्धा पाहा : Kim Jong Un : हुकूमशाह किम जोंगची 9 वर्षांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य; Photos ने जगाचे लक्ष वेधले
आईवडिलांच्या इच्छेखातर सना डॉक्टर झाली ज्यानंतर तिनं संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत कारकिर्दीत मैलाचा आणखी एक दगड रचला. सध्या होणारं कौतुक आणि प्रशंसा पाहून आपणही भारावलो आहोत अशीच प्रतिक्रिया तिनं माध्यमांशी संवाद साधताना दिली.
पाकिस्तानात हिंदूंची संख्या मोठी
(Hindus in pakistan) पाकिस्तानमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे. या देशात साधारण 75 लाख हिंदू आजही वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश लोकसंख्या सिंध प्रांतात वास्तव्यास आहे. 1998 च्या जनगणनेनुसार पाकिस्तानात त्यावेळी 1.6 टक्के म्हणजेच 30 लाखांच्या घरात हिंदूंची लोकसंख्या होती. 2017 मध्ये पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 20.77 कोटी इतकी होती. सध्या हा आकडा वाढला असेल सोबतच देशातील हिंदूंच्या संख्येतही बदल झाले असतील ही बाब नाकारता येत नाही.