सौदी अरबच्या राजाने सुट्टयांमध्ये खर्च केले ६४१ कोटी
सऊदी अरबचे राजा सलमान यांनी त्यांच्या सुट्टयांवर इतके पैसे खर्च केले आहेत की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. किंग सलमान यांनी मोरक्कोमधील घालवलेल्या सुट्ट्यांमध्ये जवळपास १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६४१ कोटी रुपये खर्च केले आहे.
मुंबई : सऊदी अरबचे राजा सलमान यांनी त्यांच्या सुट्टयांवर इतके पैसे खर्च केले आहेत की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. किंग सलमान यांनी मोरक्कोमधील घालवलेल्या सुट्ट्यांमध्ये जवळपास १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६४१ कोटी रुपये खर्च केले आहे.
किंगच्या स्वागतासाठी स्वत: मोरक्कोचे पंतप्रधान एअरपोर्टवर आले होते. आणि त्यांना ७४ एकरमध्ये बनवलेल्या समर पॅलेसपर्यंत घेऊन गेले. जुलै महिन्यात ते मोरक्कोला गेले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार किंग सलमान दरवर्षी सुट्टी घेऊन फिरायला जातात. यावर्षी ते १००० लोकांसोबत मोरक्कोला गेले होते. या लोकांमध्ये मंत्री, सल्लागार आणि नातेवाईकांचा समावेश आहे. ज्यांनी सर्वात अलिशान हॉटेल बुक केले होते.
२०१६ पासून ७४ एकरवरील या पॅलेसचं काम सुरु होतं. पाहुण्यांना खूश करण्यासाठी पॅलेसमध्ये इमारती, हॅलिपॅड्स बनवले गेले. मोरक्कोला पर्यटनातून मिळणाऱ्या एकूण फायद्याच्या भागात १.५ टक्के भाग सलमान यांच्या मोरक्को भेटीचा आहे.