रियाद : सौदी अरबमधील राजपुत्राचा सोमवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरबमधील राजुपत्र मन्सूर बिन मोकरेन यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात राजुपुत्र मन्सूर बिन मोकरेन यांचा मृत्यू झाला.


हेलिकॉप्टर अपघाताचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. या अपघातासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.


दक्षिण सौदी अरेबियात हा अपघात झाला आहे. सौदीमधील स्थानिक वृत्तांनुसार, या हेलिकॉप्टर अपघातात कुणीच बचावलेलं नाहीये.


या हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी कालच सौदी अरबने यमेनचं एक क्षेपणास्त्र पाडलं होतं. रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ हे क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आलं होतं.


सौदी अरबमध्ये एक मोठी राजकीय उलथापालथही सुरु आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. तसेच, प्रमुख उद्योजकांसह राजपुत्र आणि अनेक आजी-माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. सर्व राजपुत्र, मंत्री आणि उद्योगपतींची बँक खाती सील करण्यात आली आहे.


सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांना पूर्वीपासूनच अघोषित शासक म्हटलं जात होतं. संरक्षण क्षेत्रापासून आर्थिक क्षेत्रापर्यंत मोहम्मद बिन सलमान हे नियंत्रित करत आहेत.