Smoking Break in School : शाळा एक असं ठिकाण आहे जिथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य निर्माण करतात. शिक्षक आणि शाळा प्रशासनाची एकंदरीत जबाबदारी असते की ते विद्यार्थ्यांचं आयुष्य मार्गी लावतील किंवा त्यांन उज्ज्वल भविष्य मिळेल याची काळजी घेतात. सगळीकडे असं सुरु असताना एका शाळेत काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना सिगरेट पिण्यासाठी ब्रेक देण्यात येतो. या मागे एक विचित्र कारण असून ते फार वेगळं असल्याचं म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज वेबसाइट डेली मेलची 2023 च्या रिपोर्ट्सनुसार, क्वीन्सलॅंडच्या अरथूसा कॉलेजच्या डिसेप्शन बे कॅंपसमध्ये विद्यार्थ्यांना सिगरेट पिण्यासाठी किंवा धुम्रपान करण्याची शाळा परवानगी देते. रिपोर्ट्नुसार, जवळपास 50 मुलं हे शाळेत बनवण्यात आलेल्या स्मोकिंग झोनमध्ये सिगरेट पितात. कॉलेजनं हा दावा केला आहे की ते आधी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडून याविषयी परवानगी घेतात. पण एका आई-वडिलांनी द संडे मेलशी याविषयी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांनी या सगळ्याला नकार दिला होता. तरी सुद्धा मुलांना धुम्रपान करु देतात. 


शाळेचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना धुम्रपान करण्याची सवय लागते. ते गुपचूप धुम्रपान करु लागतात मग सिगरेट पिण्याच्या सवयीमुळे शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यातून वाचण्यासाठी शाळेनं कॅम्पसमध्ये सिगरेट कॉर्नर बनवलं. जिथ मुलं सुरक्षित राहतात आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यात येतं. शाळेचं म्हणणं आहे की असे नियम बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की ज्या मुलांना सिगरेटची सवय झालेली असते ते शाळेत देखील त्यांचं स्ट्रेस कमी करु शकतात आणि त्यांच्या हिंसक स्वभावाला ताब्यात आणू शकतात. 


हेही वाचा : बाईकची टाकी नेहमी फूल ठेवल्याने मिळतो जबरदस्त मायलेज? उत्तर ऐकून तुम्हाला होईल आश्चर्य


शाळेच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, एजंसी आणि मेडिकल अथॉरिटीजकडून देखील याविषयी काही लपवलेलं नाही. त्यांनी ही पॉलिसी सगळ्यांसमोर ठेवली आहे. एका आई-वडिलांनी तक्रार केली होती की अशा सगळ्या वातावरणामुळे त्यांचा मुलगा हा धुम्रपान करु लागला आहे. आता ही शाळा कोणती तर अरथूसा कॉलेज आहे. या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून 7-12 वर्षे वयोगटातील अशा मुलांना शैक्षणिक आणि व्यावसायिक शिक्षण देत आहे जे मुख्य प्रवाहातील शिक्षण प्रणालीमध्ये बसू शकले नाहीत.