शाळेतील पोल डान्स प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित
शिक्षक दिनाच्या दिवशी घडला हा प्रकार
मुंबई : शिक्षक दिनाच्या दिवशी एक अजब प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुख्याध्यापकांनाच आजच्या दिवशी निलंबित करण्यात आलं आहे. चीनमध्ये एका किंडरगार्डन शाळेत विद्यार्थ्यांसमोर चक्क पोल डान्सचं आयोजन केलं होतं. या प्रकरणा अंतर्गत प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.
या प्रकरणी पालकांमध्ये भरपूर नाराजी दिसत आहे. विद्यार्थ्यांसमोर असा प्रकार घडवून आणल्याप्रकरणी मुख्याध्यापकांना काढून टाकलं आहे. सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस होता. आणि याचवेळी या पोल डान्सचं आयोजन केलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे पोलवर चीनचा झेंडा लावण्यात आला होता. या पोल डान्स करता बाहेरून कलाकार बोलवण्यात आले होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरून सगळीकडून टिका होत आहे.