Planet Killer Asteroid : वैज्ञानिकांनी शोधला प्लॅनेट किलर लघुग्रह, 15.KM चा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार?
Planet Killer Asteroid - वैज्ञानिकाच्या एका चमूने तीन लघुग्रह शोधून शोधून काढले आहेत. यातील एक आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह असल्याचं बोललं जातंय. महत्त्वाची बाब म्हणजे हा लघुग्रह सूर्याच्या तेजोमय प्रकाशात कायम लपलेला असल्याने त्याला शोधून काढणं कठीण असतं.
Planet Killer Asteroid : काही कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक लघुग्रह आदळल्याने प्रलय आलेला, पृथ्वीवरून डायनोसॉर विलुप्त (asteroid ended the age of the dinosaurs) झाले, अशी थेअरी मांडली जाते. पृथ्वीसाठी धोकादायक असा लघुग्रह वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. वैज्ञानिकांच्या एका चमूने पृथ्वीजवळ असणाऱ्या तीन लघुग्रहांचा ( Asteroids) शोध घेतला आहे. यापैकी एकाचं नाव 2022 AP7 असं आहे. हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो. हा लघुग्रह गेल्या दशकभरात आढळून आलेला सर्वात मोठा लघुग्रह आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे लघुग्रह सूर्याच्या प्रकाशात कायम लपलेले असतात, ज्यामुळे त्यांना शोधून काढणं अत्यंत कठीण होतं.
डार्क एनर्जी ( Dark Energy ) कॅमेऱ्याने लावला शोध
हे लघुग्रह कायम सूर्याच्या प्रकाशात, सूर्याच्या तेजात लपलेले असतात. त्यामुळे त्यांचं सूर्यास्ताच्या आधी संधिप्रकाशवेळी त्यांचं निरीक्षण करण्यात आलं. यासाठी अमेरिकेतील चिलीमधील सेरो टोलोलो इंटर अमेरिकन ऑबझर्व्हेटरीमधील डार्क एनर्जी ( Dark Energy Camera ) कॅमेऱ्याच्या मदतीने शोधून काढण्यात आलं. हा कॅमेरा 2013 ते 2019 दरम्यान डार्क एनर्जीचा सर्व्हे करण्यासाठी तयार करण्यात आला होता. या हायटेक कॅमेऱ्याच्या मदतीने अतिशय संवेदनशीलतेने हा लघुग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांच्या चमूला यश आलं.
याबाबतचा एक लेख द ऍस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हे तीनही लघुग्रह पृथ्वी आणि शुक्राच्या कक्षेत आढळून येणाऱ्या एका समूहाचा भाग असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र सूर्याच्या तेजामध्ये त्यांना पाहणं किंवा कॅप्चर करणं अत्यंत कठीण होतं. म्हणूनच असे लघुग्रह कायम वैज्ञानिकांच्या टेलिस्कोपासून दूर राहतात. आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह सीएनएन ला दिलेल्या दिलेल्या एका मुलाखतीत 2022 AP7 हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोका ठरू शकतो असं म्हंटल आहे.
हेही वाचा : Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं
या लघुग्रहाचं आकारमान (Lenght of Asteroid) किती?
संशोधकांनी शोधून काढलेल्या तीन लघुग्रहांपैकी सर्वात मोठ्या लघुग्रहाची लांबी 1.5 किलोमीटर आहे. 2022 AP7 या लघुग्रहाच्या कक्षेमुळे हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो. सध्याच्या घडीला वैज्ञानिकांकडे याबाबतची अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे.
Asteroid पृथ्वीवर आदळला तर काय होईल?
संशोधकांनी याबाबतची माहिती देतांना सांगितलं की, या लघुग्रहाची संपूर्ण माहिती मिळाली नसल्याने भविष्यात हा लघुग्रह पृथ्वीसाठी किती धोकादायक ठरू शकतो याबाबत आताच बोलणं उचित ठरणार नाही. मात्र एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचा पृथ्वीवर विनाशकारी प्रभाव पाहायला मिळू शकतो. अशी घटना घडली तर त्यानंतर धूळ आणि वातावरण प्रदूषित करणारे घटक पुढील अनेक वर्ष वातावरणात तसेच राहतील. परिणामी पृथीवर पडणारा सूर्यप्रकाशही कमी होईल. पृथ्वीला संपवण्याची क्षमता असणारे साधारण 1000 लघुग्रह आहेत, ज्यांची लांबी एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे.