Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं

तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे.

Updated: Nov 6, 2022, 03:25 PM IST
Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं title=

Plane Crash In Tanzania: तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे. मात्र अजूनही ही आकडेवारी स्पष्ट नसल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत किती जण मृत पावलेत याबाबत कोणतीही माहिती नाही. या विमानतळाजवळच विक्टोरिया लेक आहे. तलावात पडलेल्या विमानातून प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

टांझानिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (TBC) ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राजधानी दार एस सलाम येथून उड्डाण करणारे विमान वादळ आणि मुसळधार पावसामुळे व्हिक्टोरिया तलावात पडले. प्रेसिजन एअरचे विमान दार एस सलाम येथून बुकोबा व्हाया मवांझा मार्गे उड्डाण करत होते. 

टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी बचावकार्य सुरू असताना शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, 'मला प्रिसिजन एअरचे विमान कोसळल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. यावेळी आपण शांत राहू या कारण बचाव पथक प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात गुंतलेली आहेत. मदतीसाठी मी देवाला प्रार्थना करत आहेत.'