सध्या कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून आणि तोंडातून सँपल्स घेतले जातात. मात्र त्यातून अनेकांना त्रास होत असल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. पण नेदरलँडमधील एका वैज्ञानिकाने त्यावर उपाय शोधून काढला आहे. या उपायानुसार एका रिकाम्या केबिनमध्ये जोरात फक्त ओरडण्याची गरज आहे. केवळ एवढंच केल्याने तुमची कोरोना टेस्ट होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका केबिनमध्ये जोरात ओरडल्याने किंवा जोरात गायल्याने एक इंडस्ट्रियल एयर प्युरीफायर तोंडातून निघालेल्या पार्टिकल्सची तपासणी करेल आणि त्याद्वारे तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही, याची चाचणी करता येऊ शकते.


अशाप्रकारच्या टेस्टला स्क्रीमिंग कोविड टेस्ट असं म्हटलं जातं. नेदरलँडचे शास्त्रज्ञ पीटर वैन वीस यांनी ही चाचणी शोधून काढली आहे. वैज्ञानिक पीटर यांनी सांगितल्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती ओरडते, तेव्हा त्याच्या तोंडातून १० हजार पार्टिकल्स बाहेर पडतात. त्यामुळे इंडस्ट्रीयल एयर प्युरिफायरने या पार्टिकल्समधून कोरोना चाचणी करणं सोयीस्कर पडेल. नेदरलँडच्या अमस्टरडॅममधील कोरोना टेस्टिंग सेंटरजवळच आपला बूथ लावला आहे, जिथे अशाप्रकारे कोरोना चाचणी केली जात आहे.


ओरडून किंवा गाणं गाऊन केली जाणारी अशाप्रकारची कोरोना चाचणी ही सोप्पी असल्याचं मत इथल्या बूथमध्ये चाचणी केलेल्या व्यक्तीने म्हटलंय. अशाप्रकारच्या चाचणीत कोणत्या वेदनाही होत नाहीत. शिवाय या चाचणीसाठी केवळ ३ मिनिटं लागत असल्याचंही सांगण्यात येत आहे.