ज्ञानदेव वाघुंडे, बेल्जियम: बेल्जियममधील मेसे बोट्यनिक गार्डनमध्ये दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठं फुल उमलायला सुरवात झाली आहे. साधारणपणे 75 किलो पेक्षा  जास्त या फुलाचे वजन भरतं. या वनस्पतीला सात वर्षांमध्ये एकदाच येवढे मोठं फुल लागतं. मात्र या फुलाचं आयुष्य फक्त 48 तासांच आहे. टायटन ॲरम असं या  वनस्पतीचं नाव आहे. आज आपण टायटन ॲरम या वनस्पती माहिती जाणून घेणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेल्जियममध्ये मेसे बोट्यनिक गार्डन आहे. हे गार्डन 92 हेक्टर परिसरात पसरलेले आहे. या गार्डनमध्ये जगभरातील 18 हजार जिवंत वनस्पतींचा ठेवा जपण्यात आलाय.  यामध्ये जगभरातील अति पर्जन्य छायेतील, दमट हवामानातील, उष्ण कटीबंधातील, पाण्यातील तसेच आयुर्वेदीक वनस्पती संशोधनासाठी ठेवण्यात आल्या आहे.


या ठिकाणी जगातील मोठं फुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायटन ॲरम या वनस्पतीलाही संशोधनासाठी ठेवण्यात आले आहे.  मुळच्या इंडोनेशियातील सुमत्रा रेन  फॉरेस्टमधील ही वनस्पती आहे. सुरुवातीला साधारण झाडाप्रमाणेच या वनस्पती वाढ होते. मात्र सात ते आठ वर्षानंतर एकदाच अशाप्रकारे फुल लागतं. याची उंची 8  फुटांपर्यंत होते.


जगातलं सगळ्यात मोठं फुल, आयुष्य फक्त ४८ तास


 उंची नुसार आणि फुलाच्या आकारानुसार या फुलाचे वजन 75 किलो पेक्षा जास्त भरते. एकदा संपुर्णपणे या फुलाची वाढ झाल्यानंतर फक्त 47 तास हे फुल जिवंत  राहतं. या फुलाला एक विशिष्टप्रकारचा उग्र वास येतो. त्यामुळे या फुलाला मृत फुल म्हणूनही ओळखलं जातं. 



संशोधनासाठी या फुलाला बोट्यनिक गार्डनमध्ये ठेवलं असलं, तरी फुल फुलण्याच्या कालावधील पर्यटक हे उमललेलं दुर्मिळ फुल पाहण्यासाठी गर्दी करत असतात.  तसेच लिलीचे पानही या ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेतं. 


पाण्यातल्या लिलीच्या परिवारातील हे सर्वात मोठं पान आहे. हे पान अडीच मीटर पेक्षा जास्त वाढतं. तर 45 किलो पर्यंत या पानाची वजन पेलवण्याची क्षमता आहे.