आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर पाहा
विमान दुर्घटनाग्रस्त, १६ जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : अमेरिकेत एक सैनिकी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला.
अमेरिकेत एक सैनिकी विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. हे विमान उड्डाण केल्यानंतर रडारवरून गायब झालं होतं. त्यानंतर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली.
सरकारविरोधात नागरिकांचे आंदोलन
व्हेनेजुएलात सरकारविरोधात नागरिकांचं आंदोलन सुरू आहे. वेनेजुएलाच्या जुलिया शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली. नवं संविधान तयार करण्यासाठी सदस्यांच्या नियुक्तीसाठी 30 जुलैला मतदान होणार आहे. मात्र विरोधक आणि नागरिक या मतदानाच्या विरोधात आहेत.
अभिनेत्याचा दारुच्या नशेत गोंधळ
ह़ॉलिवुडच्या ट्रांसफॉर्मर चित्रपटात काम केलेला अभिनेता शिया ला बियॉफ याला जॉर्जियात दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी अटक करण्यात आलंय. याप्रकणाचा व्हिडिओ पोलिसांनी जारी केलाय. यात शिया पोलिसांना अटक का केली याचा जाब विचारताना दिसतोय. यावेळी पोलिसांना त्याने शिवीगाळही केली.
इटलीत ज्वालामुखी सक्रीय
इटलीच्या माऊंट वेसुवियसात पुन्हा एकदा ज्वालामुखी सक्रीय झालाय. यामुळे जंगलाला आग लागलीय. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. धुराचे लोट नेपल्स शहरातूनही दिसत आहेत. या आगीची तीव्रता पाहता लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय.
सीरियात युद्धविराम
सीरियात युद्धविराम असल्याने डेरा भागातील रस्ते साफ केले जात आहेत. यामुळे विस्थापितांना त्यांच्या घरी परतण्यास मदत होईल असं सांगण्यात येतंय. या भागात पुन्हा हल्ले होऊ नये यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. जी-20 संमेलनात ट्रम्प आणि पुतिन यांच्यात वार्तालाप झाल्यानंतर रविवारपासून या भागात युद्धविराम लागू केलाय.
चीन आणि रशिया युद्ध सराव
भूमध्य सागरात चीन आणि रशियाने संयुक्तरित्या युद्ध अभ्यास केला. या युद्धाभ्यासात चीनच्या तीन युद्धनौकांनी सहभाग घेतला. या युद्धाभ्यासामुळे दोन्ही देशांतील सैन्य संबंध सदृढ होतील असं सांगण्यात येतंय.
चीनमध्ये मुसळधार पाऊस
दक्षिणी चीनमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुरस्थिती तर काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या. गुआंझी भागात दोन पुल वाहून गेलेत.. तर या अतिवृष्टीमुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
दक्षिण चीनच्या एका भागात पावसाचा हाहाकार माजला असताना दूस-या बाजूला मात्र कडाक्याचं ऊन पाहायला मिळतंय. हि उष्णता प्राणीसंग्राहालयातील जनावरांना असह्य होत आहे. त्यामुळे बीजिंगच्या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी खास उपाययोजना करण्यात आल्यात. काही प्राण्यांसाठी बर्फाची सोय केलीय. तर काही प्राण्यांवर पाण्याचा फवारा मारण्यात येतोय.