सॅन फ्रॅन्सीस्को : खरेतर माकडचाळे हा अनेकदा हसण्याचा आणि दूर्लक्ष करण्याचा विषय. पण, एका माकडाचा माकडचाळा हा चक्क वादाचे कारण ठरला. इतकेच नव्हे तर तो वाद कोर्टातही गेला आणि कोर्टाला या प्रकरणाची दखलही घ्यावी लागली. कोर्टाने या प्रकरणावर विचारपूर्वक निकालही दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण आहे सॅन फ्रान्सिस्को येथील. प्रकरण तसे गंमतीचे पण, तितकेच गंभीरही. एका माकडाने फोटोग्राफर डेव्हिड स्लाटरचा कॅमेरा घेऊन चक्क एक सेल्फी काढला. अर्थात, कोणतीही गोष्ट निरखून पाहणे आणि त्यासोबत माकडचाळे करणे हा कोणत्याही माकडाचा स्वभाव. अशाच एका फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यासोबत चाळा करत असताना माकडाकडून चुकून सेल्फी निघाला. काही महिन्यांपूर्वी हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे फोटोचे महत्त्व लक्षात घेऊन फोटोग्राफरने या फोटोच्या कॉपीराईटवर दावा केला.


दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले. माकडाने काढलेल्या सेल्फीवर हक्क कोणाचा? बऱ्याच विचारनंतर न्यायालयाने निकाल दिला की, कोणत्याही स्वरूपात एखाद्या व्यक्तीचा अधिकार प्राण्याला देता येणार नाही. त्यामुळे माकडाने काढलेल्या त्या सेल्फीवर फोटोग्राफरचाच हक्क असेन. पण, फोटोच्या कॉपीराईटमधून येणाऱ्या उत्पन्नातील २५ टक्के वाटा हा इंडोनेशियातील माकडांच्या विशेष प्रजातीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येईल.


फोटोग्राफर डेव्हिड स्लाटरने हा खटला जिंकला असून, सेल्फी कॉपीराईटमुळे मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी माकडांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी द्यावा लागणारा २५ टक्के वाटा सोडून उर्वरीत ७५ टक्के वाटा हा डेव्हिड स्लाटरला स्वत:कडे ठेवता येणार आहे. अशा प्रकारे माकडाने घेतलेल्या सेल्फीवरून निर्माण झालेल्या वादाचा कायदेशीर निपटारा झाला आहे.