`त्याच्याकडे ट्रम्प यांचे Sex Tapes, मैत्रिणीला ट्रम्प म्हणालेले, तुझे निपल्स...`; `तिचा` खळबळजनक दावा
Sex Tapes of World Leaders: ट्रम्प यांना माझे निपल्स आवडायचे असंही तिने आपल्याला सांगितल्याचा दावा या महिलेनं केलं आहे. एका मैत्रिणीबरोबर ट्रम्प यांचे नियमितपणे लैंगिक संबंध असायचे असा दावा या महिलेनं केला आहे.
Sex Tapes of World Leaders: सोमवारी अमेरिकेतील कोर्टाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणासंदर्भातील नव्या कागदपत्रांसंदर्भातील माहितीचा खुलासा केला आहे. सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणामध्ये आरोपी अब्जाधीश जेफ्रीविरोधात खटला सुरु असतानाच त्याने 2019 साली आत्महत्या केली होती.
अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे सेक्स टेप केले शूट
समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. जेफ्री एपस्टाईनने अनेक नामवंत व्यक्तींचे सेक्स टेप रेकॉर्ड केले होते असा या महिलेचा दावा असल्याचं महिलेने म्हटलं आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिन्स अँण्ड्रूज आणि ब्रिटीश उद्योजक रिचर्स ब्रॅनसन यांच्या व्हिडीओंचा समावेश असल्याचा महिलेचा दावा केला. या वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये या नामवंतव्यक्ती महिलांबरोबर सेक्स करताना दिसत असून या व्हिडीओंची कॉपी आपल्याकडे असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.
मैत्रिणीबरोबर ट्रम्प यांचे संबंध
या महिलेने अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा आपल्या एका मैत्रिणीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचा दावाही केला आहे. न्यूयॉर्कमधील जेफ्री एपस्टाईनच्या घरात ट्रम्प माझ्या मैत्रिणीबरोबर वरचेवर लैंगिक संबंध ठेवायचे असं या महिलेचं म्हणणं आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तामध्ये, या महिलेला तिच्या या मैत्रिणीनेच ट्रम्प यांच्याबरोबर असलेले संबंध तिला कसे आवडतात याबद्दल सांगितलं होतं. ट्रम्प यांना माझे निपल्स आवडायचे असंही तिने आपल्याला सांगितल्याचा दावा या महिलेनं केल्याचं 'न्यूयॉर्क पोस्ट'चं म्हणणं आहे.
आरोपांवरुन घुमजाव
मात्र 2016 साली या महिलेने केलेले आरोप मागे घेतले. 2016 मध्ये ऑक्टोबर महिन्यात लिहिलेल्या ईमेलमध्ये महिलेने, यामुळे माझ्या कुटुंबाबद्दल केवळ 'नकारात्मक गोष्टी पसरतील', 'कुटुंबाला त्रास होईल' अशी भीती वाटू लागल्याने महिलेने आरोप मागे घेतले. यापूर्वीही अनेकदा ट्रम्प यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. असं असतानाच आता या नव्या आरोपांमुळे अमेरिकेत राजकीय पडसाद उमटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नंतर केला अजब खुलासा
2019 साली तिने 'न्यू यॉर्कर'मधील लेखात बोलताना, "आपण एपस्टाईनच्या वागणुकीडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या सेक्स टेपसंदर्भात विधानं केली," असं सांगितलं. या आरोपांबद्दल बोलताना ट्रम्प यांचे सल्लागार चेनयुंग यांनी, "हे बिनबुडाचे आरोप आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि मेरिटला धरुन नाहीत," असं म्हटलं आहे. क्लिंटन यांचे प्रतिनिधी अँजल उरेना यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.