Stones As Sex Toy: माकडं `या` गोष्टीचा करतायत सेक्स टॉय म्हणून वापर, धक्कादायक खुलासा!
2016 ते 2020 दरम्यान अशा प्रकारचे काही व्हिडीओ समोर आले होते. यानंतर याबाबत अभ्यास सुरु झाला
Monkeys in Bali frequently use stone tools as sex toys : माकडांची सर्वात जुनी प्रजाती मॅकेन्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्या रिसर्चनुसार ही धक्कादायक माहिती ऐकून कदाचित तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही.
कॅनडाच्या काही वैज्ञानिकांनी इंडोनेशियातील बालीमध्ये माकडांवर एक रिसर्च केला. यामध्ये मॅकेन्यू प्रजातीची माकडं माणसांसारखे सेक्स टॉय वापरात असल्याचं समोर आलं आहे. या नव्या रिसर्चमध्ये ही माकडं चक्क दगडांचा वापर सेक्स टॉयसारखा करत असल्याचं समोर आलं आहे.
कॅनडामधी लिथीब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, लांब शेपटीची माकडं दगडांना आपल्या गुप्तांगावर घासून त्यांचा सेक्स टॉय सारखा वापर करतात. रिपोर्टनुसार नर आणि मादा दोघांकडून दगडांचा सेक्स टॉय सारखा वापर केला जातो. मादा माकडांच्या तुलनेत नरांमध्ये दगडांचा असा वापर करण्याचं प्रमाण अधिक आहे.
2016 ते 2020 दरम्यान अशा प्रकारचे काही व्हिडीओ समोर आले होते. यानंतर याबाबत अभ्यास सुरु झाला. या जंगलातील मॅकेन्यू प्रजातीची माकडं दगडांचा नक्की कसा वापर करतात यावर रिसर्च सुरु होता.
या जंगलातील माकडं टोकदार किंवा खडबडीत कडा असलेल्या दगडांचा जास्त वापर करत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, लैगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी मादा माकडं दगडांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारचं माकडांचं वर्तन हे काही नवीन नाही. यावरून माकडांच्या स्वभावाबतात माहिती मिळते असं वैज्ञानिक म्हणतात.
अनेक वर्षांपासून लैगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी माणसाकडून बनवल्या गेलेल्या अनेक गोष्टींचा माकडं वापर करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नव्हे तर, लैंगिक आनंद घेण्यासाठी माकडांकडून हरणाच्या पाठीचाही वापर केला जात असल्याचं जपानमध्ये पाहायला मिळालं आहे.
संशोधकांच्या मते आदिमानवाकडून ज्या दगडांचा वापर शिकारीसाठी केला जायचा, त्याचाच वापर नंतर माकडं करायला लागलीत. यानंतर माकडांनी या दगडांचा वापर सेक्स टॉय सारखा करण्यास सुरुवात केली. हळूहळू हीच त्यांची सवय माकडांच्या पुढील पिढीकडे गेली.
monkeys use of stone tools as sex toys frequently in bali