शांघाय : चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला दुसऱ्याच चोराकडून चुकून मार बसला तर... कल्पना फिल्मी वाटतेय ना... पण, हा मजेशीर किस्सा शांघायमध्ये खरोखरच घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांघायमधली एक बँक लुटण्यासाठी दोन चोर तोंडाला मास्क लावून दाखल झाले... बँकेच्या दाराशी लावलेला सीसीटीव्ही त्यांची प्रत्येक हालचाल टिपत होता. 


एका चोरानं एक वीट हातात घेतली आणि बँकेच्या दाराशी फेकून मारली... दुसऱ्या चोरानंही त्याचीच कॉपी केली... आणि नेम धरून वीट फेकली... पण हाय रे चोराचं दुर्दैव... चुकून ही वीट पहिल्या चोराच्या डोक्यात पडली... 


हा वार इतका जोरदार होता की वीट डोक्यात बसताक्षणीच पहिला चोर जागच्या जागी कोसळला... आणि वीट फेकणाऱ्या चोराचे धाबे दणाणले... चोरीचा प्लान कॅन्सल करून पहिल्या चोराला उचलून त्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागला. 


चोर असाच मुर्खपण करत राहिले तर आमचं काम सोप्पं होईल, असं ट्विट करत शांघाय पोलिसांनीच हा मजेशीर प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय.