मुंबई : रशिया-युक्रेनच्या वादात आणखी एक अशी माहिती समोर येत आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रशियाच्या ब्युटी क्विनने आणखी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याची प्लास्टीक सर्जरी केली. मात्र ती अशी फेल गेली की, या तिचा चेहरा तर खराब झालाच, शिवाय आता तिला डोळे बंद करणे आणि हसा येत नाहीय. जी एक गंभीर बाब आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, मॉडेलने शस्त्रक्रियेवर $5600 (सुमारे 4.5 लाख रुपये) खर्च केले. खरेतर 43 वर्षीय युलिया तारासेविच मिस रशिया-आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपविजेती आहे. तिने दक्षिण रशियातील क्रास्नोडार येथील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचार घेण्याचे ठरवले. परंतु त्यानंतर मात्र तिचा चेहरा इतका बदलला आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही तिच्या सर्जरीचा पूर्वीचा आणि नंतरचा फोटो पाहू शकता.



युलियाने सांगितले की, 'मी त्यांच्याकडे सुंदर चेहऱ्यासाठी गेले होते. मला फक्त वृद्धत्वामुळे होणारे काही बारकावे दूर करायचे होते. परंतु त्यांनी माझा चेहरा विकृत केला.'


फेसलिफ्ट शस्त्रक्रिये दरम्यान, म्हणजेच पापण्यांची ब्लेफेरोप्लास्टी आणि गालांची चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेमुळे तिचा चेहरा विकृत झाला.


या शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा चांगलाच सुजला होता. यानंतर युलियाने तिचे डोळे वाचवण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडून इमर्जन्सी फॉलो-अप शस्त्रक्रिया करून घेतली. 
त्याच वेळी, तिने दोन डॉक्टरांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे, ज्यांच्यामुळे तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली. यावर डॉक्टरांचा असा दावा आहे की, तिच्या चेहऱ्याची अशी हालत, तिच्या अनुवांशिक स्थितीतून उद्भवली आहे.


हा सगळा प्रकार घडल्यानंतर युलियाने स्वतःचा चेहरा चांगला करण्यासाठी 28 लाखांपेक्षा ($37,000) जास्त खर्च केल्याचा दावा केला आहे आणि ही रक्कम अजूनही वाढत आहे. कारण तिचा चेहरा अजुनही ठिक झालेला नाही.


रशियाच्या तपास समितीने सांगितले की, डॉ खालेद आणि डॉ. कोमारोव यांचे 'जीवन आणि आरोग्याची सुरक्षा' कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे आणि ते त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल.