बुध ग्रह आकार बदलतोय! संशोधकांनाही बसला धक्का; आकडेवारी म्हणते, 7 किलोमीटर...
Shocking Findings About Mercury: नासाने पाठवलेल्या यानाच्या माध्यमातून सापडलेल्या माहितीच्या आधारे सादर केलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Shocking Findings About Mercury: आपल्या सौर्यमालेमध्ये सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध! सूर्यापासून सर्वात जवळ ग्रह म्हणून बुध ग्रहाबद्दल खगोलशास्त्रज्ञांना प्रचंड आकर्षण आहे. मात्र आता या ग्रहाचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुध ग्रह आकुंचन पावत असून त्याच्या पृष्ठभागावर मोठमोठ्या आकाराची गोलाकार वर्तुळं पडत असल्याचं दिसत आहे, असं निरिक्षणामधून समोर आलं आहे. एका अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाची त्रिज्या जवळपास 7 किलोमीटरने कमी झाली आहे. सूर्यापासून सर्वात जवळ असूनही बुध ग्रहाचा गाभा थंड पडत चालला आहे. ज्या डोंगरासारख्या भागापासून बुध ग्रहाचा भागा तयार झाला आहे त्याची घनताही कमी होत आहे.
काय म्हटलं आहे या अहवालामध्ये?
'नेचर जिओ सायन्स' या नियतकालिकेमध्ये हा अहवाल छापण्यात आला आहे. या संशोधन अहवालाचे लेखक आणि युनायटेड किंग्डममधील मुक्त विद्यापीठाचे संशोधक बेंजामिन मॅन आहेत. बेंजामिन यांनी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने मॅसेंजर मिशन (2011-2015) मधील डेटा वापरुन बुध ग्रहाचा सखोल अभ्यास केला आहे. या संशोधकांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर काही आकृत्या आणि वर्तुळं दिसून आली आहेत. या वर्तुळांना ग्रेबेस असं म्हणतात. आतापर्यंतच्या संशोधनानुसार बुध ग्रह हा आकुंचित ग्रह आहे. पूर्वी त्याचा आकार अधिक मोठा होता. मात्र आता आजच्या तारखेलाही बुध ग्रह आंकुंचन पावत असल्याची माहिती समोर आळी आहे.
सर्वात पहिला पुरावा 1974 साली सापडला
बेंजामिन यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रेबेस दिसून येणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. बुध ग्रहाच्या पृष्ठभागाखाली हलचाली फारच सक्रीयपणे होत असून त्याचा परिणाम ग्रहाच्या आकारावर होत असल्याचं दिसून येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बुध ग्रह आकुंचन पावत असल्याचा पहिला पुरावा 1974 साली समोर आला होता. 'मेरिनर 10' मोहिमेमधील यानाने अनेक किलोमीटर उंचीवरुन काढलेल्या या वर्तुळांचे फोटो दिसले होते.
'नासा'ने केला अभ्यास; अनेक प्रश्न अनुत्तरित
यानंतर 'नासा'च्या मेसेंजर मोहिमेने 2011 आणि 2015 दरम्यान बुध ग्रहाचा परिक्रमा करत त्याचा अभ्यास केला. बुध ग्रहाच्या सर्व पृष्ठभागावर ही वर्तुळं दिसून आली. या अभ्यासामध्ये बुध ग्रहाची त्रिज्या जवळपास 7 किलोमीटरने कमी झाली आहे. मात्र हे का आणि कसं झालं याची माहिती वैज्ञानिकांकडे नाही. वैज्ञानिकही या नवीन माहितीमुळे गोंधळून गेले आहेत.
3 अब्ज वर्ष जुनं वर्तुळ
बुध ग्रहावरील सर्वात मोठं वर्तुळ हे 3 अब्ज वर्ष जुनं आहे. मात्र बुध ग्रहावरील सर्व वर्तुळं एवढी जुनी आहेत आणि आता ती दिसू लागली आहेत का? याचा शोध संशोधक घेत आहेत. या वर्तुळांचा आकार अजूनही वाढत आहे का? हा सुद्धा न सुटलेला प्रश्न आहे.