मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला विचित्र घटनांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे लोक प्रसिद्धीसाठी काहीही करायला असतात. ज्यामुळे ते अशी विचित्र गोष्ट करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. हो हे खरं आहे, कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 30 मजली उंच इमारतीवरुन स्पायडर मॅन प्रमाणे खाली उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती कोणत्याही सेफ्टी शिवाय हा स्टंट करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लिहिलेल्या कमेंटनुसार, हा चीनच्या गुइयांग येथील हुआगुयुआनचा व्हिडीओ आहे, जिथे 27 मे रोजी दुपारी एक पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती एका उंच इमारतीच्या टोकावर दिसला. तो जरा विचित्र वागतोय असं वाटत होतं. त्याने आधी डोके खाली केलं आणि हवेत पाय लटकवले.


तो माणूस वारंवार त्याच्या फोनकडे बघत होता आणि मग अचानक खाली वाकून जणू काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत होता.


मात्र यामध्ये बचाव पथक तेथे पोहोचले होते. यानंतर अचानक त्या व्यक्तीने खिडकीवर पाय ठेवला आणि खाली उतरण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये ही व्यक्ती खिडकीच्या मदतीने खाली उतरताना दिसत आहे. परंतु एवढं सगळं करताना हा व्यक्ती जराही घाबरलं नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, ही 30 मजली इमारत 100 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. वरून पाहिल्यावर भीतीमुळे एखाद्याची प्रकृती बिघडू शकते आणि तिथून पडल्यानंतर वाचण्याची अपेक्षा तर अगदी शुन्य आहे. 


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रत्येक मजल्यावरील खिडकीतून बचावकर्ते दिसत आहेत, ते कदाचित त्या व्यक्तीला खिडकीतून आत ओढण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथे गेले असतील, परंतु ती व्यक्ती सतत खाली उतरत आहे. ती व्यक्ती उतरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीजवळ पोहोचल्यावर त्याला आत ओढले जाते.


ज्यांनी त्या तरुणाला आत खेचले ते बहुधा रेस्क्यू टीममधील असावेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोरच्या इमारतीतून कोणीतरी काढला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.