बॉयफ्रेण्डला वाटलं की बाजूला बसलेली गर्लफ्रेण्ड मस्करी करतेय; पुढल्या क्षणी तिने प्राण सोडला
Shocking News Girlfriend Died in Front Of Boyfriend: या प्रकरणामुळे मृत महिलेच्या बॉयफ्रेण्डला मोठा मानसिक धक्का बसला आहे. सुरुवातीला त्याला त्याची गर्लफ्रेण्ड मस्करी करतेय असं वाटतं होतं. मात्र त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आहे.
Shocking News Girlfriend Died in Front Of Boyfriend: मृत्यू आणि दुर्घटना अटळ आहेत असं म्हटलं जातं. तशा आपल्यापैकी जवळपास सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लहान मोठ्या दुर्घटना होत असतात. मात्र काही दुर्घटना आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणाबरोबर घडला. सुरुवातीला त्याला त्याची गर्लफ्रेण्ड मस्करी करत आहे असं वाटलं. मात्र त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर असं काही घडलं की तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम एका विमान उड्डाणादरम्यान घडला असून त्याबद्दल समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नक्की घडलं काय?
हा संपूर्ण प्रकार अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानामध्ये घडला. ज्या महिलेबरोबर हा प्रकार घडला तिचं नाव स्टेफनी स्मिथ असं असून सदर प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला आहे. डोमिनिक रिपब्लिकवरुन नॉर्थ कॅरोलीनाला जात असतानाच स्टेफनीने प्राण गमावले. नेमकं काय घडलं याबद्दल स्टेफनीची मैत्रीन मारिया योनोतीने सविस्तर तपशील सांगितला आहे. मारिया स्वत: हा सारा प्रकार घडला तेव्हा सुट्ट्यांनिमित्त विमानाने बाहेरगावी जाण्याची तयारी करत होती.
बॉयफ्रेण्डला ती मस्करी वाटली
मासियाने जेव्हा स्टेफनीला फोन केला तेव्हा तो तिच्या बॉयफ्रेण्डने उचलला. त्याने सांगितलं की स्टेफनी विमानामध्ये त्याच्या बाजूला बसली आहे. ती डोळ्यांची बुबुळं फिरवत असून डोकं तिने सीटवर टेकवलं आहे. नेहमीसारखी ती माझी मस्करी करत आहे, असं स्टेफनीच्या बॉयफ्रेण्डने तिच्या मैत्रिणीला सांगितलं. मात्र अचानक स्टेफनीचं शरीरावरील नियंत्रण सुटल्याप्रमाणे ती कोलमडून विमानातच आपल्या सीटवरुन शुद्ध हरपल्यासारखी खाली कोसळली.
रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत प्राण सोडले; बॉयफ्रेण्डला बसला धक्का
तातडीने विमानामधील एका डॉक्टरने आणि नर्सने 41 वर्षीय स्टेफनीला मदत करण्याचा प्रयत्न केला. विमान लगेच टर्क अॅण्ड कॅइकॉस बेटावर उतरवण्यात आलं. त्यापूर्वी स्टेफनीला सीपीआर देण्यात आला. विमान उतरवण्यात आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, असं डॉक्टरांनी घोषित केलं. घडलेल्या या साऱ्या प्रकारामुळे स्टेफनीच्या बॉयफ्रेण्डला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
विमानात चढताना उत्तम होती प्रकृती
मासियाने एबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, स्टेफनी आणि ती डोमिकनमध्ये रोज एकत्र जिमला जायचे. ती रोज सकाळी वेळेत उठायची आणि समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठीही जायची. विमानामध्ये चढताना स्टेफनी फार आनंदात होती आणि सामान्यपणे बोलत होती असं तिच्या आजूबाजूच्या प्रवाशांनी सांगितलं.
कुटुंब स्वत: पाठवणार डॉक्टर
स्टेफनीच्या कुटुंबियांनी, "तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी आम्ही स्वत: आमच्या विश्वासातील एक डॉक्टर पाठवणार आहोत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊन तिचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत आणता येईल," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रोविडेशियल्स इंटरनॅशनल एयरपोर्ट आणि द रॉयल टर्क्स अॅड कॅइकॉस बेट समुहाच्या फेसबुक पेजवरुन घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे.