मुंबई : एका कारागृहातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये दोन महिला प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. महिला कारागृह हा पुरुषांच्या कारागृहापासून वेगळं होतं. तसेच या महिला अनेक वर्षापासून कारागृहात राहात होत्या. मग त्या अचानक कशा प्रेग्नेट राहिल्या? असा प्रश्न पोलिसांना पडला. ज्यानंतर त्यांनी तपास घेतला असता. एक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आहे. येथे महिला प्रेग्नेंट राहिल्यावर समोर आलं की, त्यांच्या कारागृहात एक ट्रांसजेंडर राहात होता, ज्याचे नाव डेमी आहे आणि त्याच्यामुळेच या महिला प्रेग्नेंट रहिल्या आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डेमीला महिला कारागृहातून पुरुष कारागृहात हलवण्यात आले आहे.


ट्रान्सजेंडर डेमी मायनर सावत्र वडिलांचा खून केल्याप्रकरणी 30 वर्षांची शिक्षा भोगत आहे. डेमीला एडना महान सुधारक सुविधेतून राज्य युवा सुधार सुविधेत हलवण्यात आले आहे.


डेमीचे प्रकरण एप्रिलमध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आले, जेव्हा त्याने एडना महान सुधारगृहात दोन सहकारी कैद्यांना गर्भवती केली. यानंतर त्यांना काही काळ न्यू जर्सी राज्य कारागृहात ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्याने सहकारी कैद्यांवर आपलाच लैंगिक छळा केल्याचा आरोप केला. आता डेमी सध्याच्या नवीन कारागृहातही असेच आरोप करत आहे.


डेली मेलशी केलेल्या संभाषणात, त्या तुरुंगांच्या वातावरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ''करमणुकीच्या वेळी कैद्यांच्या खोल्या खुल्या असतात. या दरम्यान एक कैदी इतर कैद्यांच्या खोलीत जाऊ शकतो, यादरम्यान त्यांनी संबंध बनवले असतील किंवा बाथरुममध्ये जाऊन देखील त्यांनी हे केलं असावं.''


आम्ही तुम्हाला सांगतो की डेमीने वयाच्या 16 व्या वर्षी थियोटिस बट्सची हत्या केली होती. बट्स हे डेमीचे सावत्र वडील होते. एका रिपोर्टनुसार, डेमी नंतर त्याच्यापासून वेगळे राहू लागली. मग एके दिवशी, बट्सवर चाकूने वारंवार हल्ला केल्यानंतर, डेमीने त्याची हत्या केली आणि न्यूयॉर्कला पळून गेला. येथे त्याला पोलिसांनी पकडले.