विमानाचा पायलट हवेत बेशुद्ध, घाबरलेल्या प्रवाशानं उचललं मोठं पाऊल, पाहा व्हायरल व्हिडीओ
तुम्हाला `धमाल` हा कॉमेडी चित्रपट आठवत असेलच, त्यामध्ये असाच काहीसा प्रसंग घडला, ज्यामध्ये ड्रायव्हर मद्यधुंद परिस्थीतीत असल्यामुळे बेशुद्ध होतो.
मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास केला असेल, किंवा ज्यांनी प्रवास केला नाही, त्यांना एकदा तरी विमानाचा प्रवास करण्याची इच्छा असेलच. परंतु समजा की, तुम्ही जर विमानाने प्रवास करत असाल, आणि ड्रायव्हरची तब्बेत खराब झाली तर? तो विमानच चालवण्याच्या स्थीतीत नसेल तर? विचार करा ही किती गंभीर घटना आहे. ज्याचा आपल्यापैकी कोणीही स्वप्नात देखील विचार करणार नाही, परंतु ही घटना खरोखर घडली आहे.
तुम्हाला 'धमाल' हा कॉमेडी चित्रपट आठवत असेलच, त्यामध्ये असाच काहीसा प्रसंग घडला, ज्यामध्ये ड्रायव्हर मद्यधुंद परिस्थीतीत असल्यामुळे बेशुद्ध होतो. तेव्हा दोन प्रवासी एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या मदत घेतात, परंतु त्याचा काही फायदा होत आणि आणि अखेर विमान क्रॅश होते. परंतु नशीबाने कोणाला काहीही होत नाही.
तसे पाहाता हा कॉमेडी चित्रपट होता ज्यामुळे सगळ्यांचा जीव वाचला. परंतु खऱ्या आयुष्यात असे होणे शक्य नाही. अशीच एक घटना अमेरिकेत एका व्यक्तीसोबत घडली, पण त्याचा पायलट दारूच्या नशेत नव्हता, त्याची तब्येत खराब झाली होती, ज्यामुळे त्या व्यक्तीचा जीव धोक्यात होता.
नक्की काय घडलं
फ्लोरिडाच्या अटलांटिक किनार्यावर येताच एका लहान विमानाचा पायलट अचानक आजारी पडला, ज्यामुळे विमानात असलेल्या एका प्रवाशाने एअर ट्राफीक कंट्रेलरची मदत घेतली. व्यक्तीने मदतीसाठी तातडीने विनंती केली आणि हवाई वाहतूक नियंत्रकांनी विमानाला सुरक्षितपणे उतरण्यास मदत केली. खरंतर या प्रवाशाला विमान उड्डाणाचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु त्याने एअर कंट्रेलरच्या मदतीने विमानाचं लॅन्डिंग केलं.
नशीबाने हा प्रवासी विमान व्यवस्थीत लॅन्ड करण्यात यशस्वी ठरला, ज्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
हा विमान लॅन्ड होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अक्षरशा अंगावर काटा आणणारा आहे.
LiveATC.net वेबसाइटनुसार, या प्रवाशाने कंट्रेलरला फोन करुन सांगितले, 'मला एक गंभीर परिस्थिती आढळली. माझा पायलट बेशुद्ध पडला. मला विमान कसे उडवायचे ते माहित नाही. ही वेबसाइट हवाई वाहतूक नियंत्रकांचे प्रसारण आणि संग्रहण करते.'
त्यावर फोर्ट पियर्स येथील हवाई वाहतूक नियंत्रकाने प्रतिसाद दिला, त्याला सिंगल-इंजिन सेसना 208 ची स्थिती माहित आहे का असे विचारले. प्रवासी म्हणाला, "मला माहीत नाही. मी माझ्यासमोर फ्लोरिडाचा किनारा पाहू शकतो आणि मला याची कल्पना नाही."
फ्लाइट अवेअरच्या माहितीनुसार, विमानाने मंगळवारी बहामासमधील मार्श हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, विमानात पायलट आणि दोन प्रवासी उपस्थित होते.
बचाव कर्मचार्यांनी पायलटला मदत केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पायलट कशामुळे आजारी पडला हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.