Earth Rotation : पृथ्वीचा वेग किती, पृथ्वीचं वय किती, पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिक्रमण म्हणजे काय या सर्वच प्रश्नांनी अनेकांच्याच मनात कुतूहल निर्माण केलं आहे. मुळात ही पृथ्वी आणि त्या पृथ्वीभोवती असणाऱ्या अनेक गोष्टी आणि आकाशगंगा या साऱ्याच्या बाबतीत आजवर अनेर खुलासे करण्यात आले. शास्त्रज्ञ, संशोधक आणि अभ्यासकांनी त्यांच्या परिनं यामध्ये योगदान दिलं. पण, आता मात्र याच वर्गानं चिंता व्यक्त केली आहे. कारणही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 University of Southern California (USC) च्या वतीनं सर्वच संशोधनांना शह देणारं निरीक्षण समोर आणलं असून, त्यामुळं येत्या काळात जीवसृष्टीवरही परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे. पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्याचा वेग प्रचंड मंदावला असून, 2010 पासून पृथ्वीच्या पृष्ठावरही त्याचा परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. 


जरनल नेचरमध्ये कैक वर्षांपासून सुरु असणाऱ्या या वादाच्या विषयावरही यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये असणाऱ्या केंद्रीय थराचा परिणाम त्याच्यावर असणाऱ्या थरांवर दिसून येतो. याशिवाय पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरही याचे परिणाम होताना दिसतात. 


पृथ्वीचे चार महत्त्वाचे थर


खगोलीय संदर्भांचा आधार घेतला असता पृथ्वीचा सर्वात अंतर्गत भागात असणारा गाभा हा टणक (स्थायू) पदार्थांपासून तयार झाला असून, त्यामध्ये लोह आणि निकेल हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामागोमाग चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारा द्रवरुपातील थर, त्यावर असतो तो म्हणजे विविध टेक्टोनिक प्लेट असणारा थर आणि सर्वात वर असतो तो म्हणजे पृथ्वीचा आणखी एक स्थायूरुपी पृष्ठ जिथं जीवसृष्टीचा वावर आढळतो.


हेसुद्धा वाचा : महाभारतातील शकुनीचा वध कोणी केला होता?


संशोधकांच्या निरीक्षणानुसार पृथ्वीच्या द्रवरुपी थराबाहेर असणारं आवरण किंवा थर अंदाजे चंद्राच्या आकाराचा आहे. त्याला थेट पाहता येत नसलं तरीही संशोधक भूलहरींच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. 


संशोधनानुसार पृथ्वीच्या गाभ्यामध्ये नेमकं काय सुरुय? 


1991 ते 2023 दरम्यान दक्षिण सँडविच बेटांवर एकामागून एक आलेल्या साधारण 121 भूकंपांचा अभ्यास आणि निरीक्षण संशोधकांनी केलं. याशिवाय फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेच्या अणू चाचण्यांच्या माध्यमातूनही त्यांनी काही माहिती मिळवली. 


विद्यापीठाचे संचालक John Vidale यांच्या माहितीनुसार पृथ्वीच्या गाभ्यामधील हालचालींचा वेग त्याच्या वर असणआऱ्या द्रवरुपी थराच्या हालचालींमुळं मंदावतोय. पृथ्वीच्या उदरात घडणाऱ्या या घडामोडींचा थेट परिणाम जीवसृष्टीवर अद्याप अधिक प्रमाणात दिसत नसला तरी, दिवस काही सेकंदांनी कमी होण्यास याच क्रियेचे परिणाम म्हणून निरीक्षणांचा भाग समजलं जात आहे. दरम्यान, पृथ्वीच्या गर्भातील हालचालींविषयीची सविस्तर आणि संपूर्ण माहिती अद्याप समोर आली नसून, ही संपूर्ण प्रक्रिया निरीक्षणाअंतर्गत असल्याचं सांगण्यात येत आहे.