Dry Leaf Butterfly Video: अनेकदा रस्त्याने जाताना किंवा उद्यानात आपल्याला सुकलेलं पान दिसतं. आपण अशा सुकलेल्या पानांकडे अनेक वेळा दुर्लक्ष करतो. पण सोशल मीडियावर असाच एक सुकलेल्या पानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल सुकलेल्या या पानात नेमकं आहे तरी काय? या व्हिडीओमधील सुकलेलं पान अनेकांना गोंधळात टाकतं. पहिल्या काही सेकंदात व्हिडीओमध्ये जमिनीवर पडलेल्या सुकलेला पानाचा व्हिडिओ तुम्ही निरखून पाहा. (Shocking Video leaf turn butterfly video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ शांतपणे पाहा. 10व्या सेकंदानंतर जेव्हा तुम्हाला हे सुकलेलं पान नसून एक फुलपाखरू आहे, हे पाहून तुम्ही अवाक् व्हाल. 'या' सुकलेल्या पानामुळे तुम्हाला नक्की धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कालिमा इनाचस हे फुलपाखरू उष्णकटिबंधीय आशिया (भारत ते जपान) मध्ये आढळतं. हे फुलपाखरू वाळलेल्या पानांचे सहज ढोंग करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. 



हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर मॅसिमो (@Rainmaker1973) याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कोपऱ्यात जमिनीवर एक सुकलेलं पान पडलं आहे. एक व्यक्ती या पानाला हात लावतं आणि ते पान हलू लागतं. तुम्हाला हा व्हिडीओ एखाद्या मॅजिकशिवाय कमी वाटणार नाही. कारण ती व्यक्ती जसं या पानाला हात लावते तसं या पानाचं रुपांतर चक्क एका फुलपाखरात होतं. हे एक सुकलेलं पान नसून एक सुंदर असं फुलपाखरु असतं.