मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही भावूक करतात. पण येथे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला खूप काही शिकवतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच आहे. जो आपल्याला बरंच काही शिकवत आहे. हा व्हिडीओ खूपच भितीदायक आहे. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे डोळे उघडतील हे देखील खरं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका वळणाच्या रस्त्यावरुन एक बस येत आहे. तेव्हाच तेथे एक बाईक चालक येतो. परंतु त्याचा तोड बिघडतो आणि तो खाली पडतो आणि सरळ बसच्या चाकाखाली जातो. परंतु त्याचं नशीब इतकं चांगलं आहे की, त्याने हेल्मेट घातलं आहे. ज्यामुळे त्याचा गंभीर अपघात टळता.


हे सगळं घडलं तेव्हा बस ड्रायव्हरने देखील वेळेवर ब्रेक मारला, ज्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. जवळील सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झाले, जे सध्या व्हायरल होत आहे.


ज्यापद्धतीने हा अपघात घडला, हे पाहिले असता जर त्या तरुणाने हेल्मेट घातले नसते आणि बस चालकाने वेळेवर ब्रेक लावला नसता, तर काय घडलं असतं हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल.


हा व्हिडीओ खरोखरंच हेल्मेटचं महत्वं तुम्हाला दाखवून देत आहे. आता तरी हा व्हिडीओ पाहून सगळे शहाणे व्हा आणि गाडी चालवताना नेहमी हेल्मेट घाला.



हा व्हिडीओ @umda_panktiyan नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. ज्याला 13 हजाराहून अधिक लाईक्स आणि 4 हजाराहून अधिक लोकांनी या रीट्वीट केला आहे. तसेच लोकांनी याव  वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.