Lightning Strike Video: पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. पावसाळ्यात वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना आपण ऐकत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर आकाशात वीज चमकत असताना झाडाखाली का उभं राहू नये हे आपल्याला कळेल. वंडर ऑफ सायन्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे


या व्हिडिओमध्ये एका मोठ्या झाडावर वीज कोसळताना दिसतेय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'म्हणूनच वादळात झाडाखाली उभे राहू नये.'


आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि शेअर केल्यानंतर 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'या झाडावर कधीच पाने उगणार नाहीत.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'झाडाखाली उभे राहणे सर्वात वाईट आहे. वादळाच्या वेळी ही सर्वात असुरक्षित जागा आहे.' 



पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटना
पावसळ्यात दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही मोठं नुकसान होतं.  वादळासारखी स्थिती निर्माण झाली किंवा विजा चमकायला लागल्या, तर तातडीने कुठल्याही घरात किंवा बंदिस्त इमारतीत आसरा घ्यायला हवा. मात्र झाडाखाली अजिबात जाऊ नये.