हृदयद्रावक बातमी! कोरोनामुळे बाळाला कुशीत न घेता आईने गमावला प्राण
कोरोनाने बाळाला आईपासून वेगळं केलं
मुंबई : कोरोना व्हायरस (Corona Virus) जगभरात अजूनही थैमान घालत आहे. अनेक देशात कोरोनावरील व्हॅक्सीनची चाचणी देखील झाली आहे. परंतु कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होत नाही. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक अशी हृदयद्रावक घटना घडली आहे की, ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
न्यूयॉर्कमध्ये (America New York) कोरोना व्हायरस संक्रमित महिलेने प्रसुति (Mother Died) नंतर आपला जीव गमावला. कोरोनामुळे महिलेने आपल्या बाळाला (Gave Birth to Baby) देखील कुशीत घेतलेलं नाही. न्यूयॉर्कमधल्या वनेसा कार्डेनस गोंजाजेस नावाच्या महिलेनं ९ नोव्हेंबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. कोरोना झाल्यामुळे वेनिसाला आणि बाळाला वेगळं ठेवण्यात आलं होतं. कोरोनामुळे चिमुकल्याला त्यांना कुशीतही घेता आलं नाही. केवळ व्हिडीओ कॉलवर चेहरा पाहता आला. त्यानंतर मात्र वनेसानं प्राण सोडले.
वनेसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वनेसा आपल्या बाळाला फक्त व्हिडिओ कॉलवर पाहू शकली. या कोरोनामुळे ती आपल्या बाळाला कुशीतही घेऊ शकली नाही. या बाळाने आपल्या आईला जन्मतःच गमावलं आहे. nbclosangeles.com च्या रिपोर्टनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर वनेसाला आपल्या बाळापासून वेगळं केलं. बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दोघांना वेगळं करण्यात आलं.
वनेसाचा नवरा अलफांसो आता आपल्या बाळाची काळजी घेत आहे. सगळ्यांना आशा होती की, वनेसा कोरोनासोबतची झुंज जिंकेल. पण कोरोनासमोर वनेसाने हात टेकले. तिचा यामध्ये मृत्यू झाला.