US Shooting : अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 3 जणांचा मृत्यू
US Shooting News : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली असून याकिमा परिसरात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेतला आहे.
US Shooting incidents : अमेरिकेतील कॅलिफोर्निया घटनेच्या 48 तासांनंतर वॉशिंग्टनमध्ये पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे. (US Shooting) याकिमा परिसरात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करुन तिघांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत बंदुकीचा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या हल्ल्यात 21 जणांना गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Shooting incident : 3 people shot dead in Washingto)
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदुकधारी व्यक्तीने एका दुकानात अचानक गोळीबार सुरु केला. यात 21 जणांना गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. दरम्यान, हल्लेखोर हा याकिमा काउंटीचा रहिवासी जरिद हॅडॉक (21) असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाळेतील गोळीबारात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. एका शाळेत अज्ञात माथेफिरुने हा अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक शिक्षिका जखमी झाली आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. डेस मोइनेस शाळेत एका शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची घटना समोर आली आहे.