Why Shortage Of Popcorn: गेल्या काही वर्षात जगभरात महागाईने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे यात आणखी भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वच वस्तूंचे भाव वधारल्याचं चित्र आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये काही वस्तू महागल्या आहेत. या दरम्यान पॉपकॉर्न, बिअर आणि स्पायसी सॉस श्रीरचा याचा तुटवडा जाणवत आहे. एवढेच नाही तर जापानमधील कांद्याचे भाव लोकांना रडवणारे आहेत. जाणून घेऊया या मागचे कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरवठा साखळीवर परिणाम


जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील पुरवठा साखळीवर खूप दबाव आहे, जर कच्चा माल उपलब्ध नसेल, तर पॅकिंगमध्ये अडचण येते. अनेक कंपन्यांनी हे मान्य केले आहे. पुरवठा साखळीतील समस्या हे जगभरातील तुडवड्याचे कारण आहे.


जर्मनीमध्ये बिअरचे भाव वधारले


जर्मनीमध्ये बाटल्यांमध्ये विकल्या जाणार्‍या बिअरचे दर लक्षणीय वाढले आहेत. बिअरची कमतरता नसून काचेच्या बाटल्या आणि अॅल्युमिनियमचे डबे बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे सोडा आणि बिअर पॅक होत नसल्याने बाजारात पोहोचत नाहीत. यासोबतच शिपिंग कंटेनर्सचंही कमतरता जाणवत आहे. या सगळ्यामागे लॉकडाऊनचा परिणाम असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियात लेट्यूस, जापानमध्ये कांदा आणि सलामी यांचीही स्थिती तशीच आहे. 


अमेरिकेत पॉपकॉर्नचा तुटवडा


अमेरिकेतही पुरवठा साखळीचा परिणाम जाणवत आहे. रेस्टॉरंटमध्ये वापरला जाणारा सॉस श्रीरचा आणि पॉपकॉर्नची कमतरता आहे. सॉसचा एक मोठा ब्रँड असलेल्या Huy Fong Foods ने पुरवठा साखळीमुळे उत्पादन थांबवले आहे. कारण सॉस बनवण्यासाठी कच्चा माल उपलब्ध नाही. त्याचबरोबर अमेरिकेत पॉपकॉर्नचा तुटवडा हाही मोठा मुद्दा बनला आहे. अमेरिकन लोकांना सिनेमा हॉलमध्ये पॉपकॉर्न खायला आवडतात, पण आजकाल पॉपकॉर्न मिळत नाहीत. मक्याचे उत्पादन आणि पॅकेजिंगचा अभाव हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे.