श्रीलंका : भारताशेजारच्या देशात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. लोकांचं जगणं कठीण झालं आहे. यामुळे संतप्त झालेले नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी लोकशाहीची काय ताकद असते हे दाखवून दिलं आहे. श्रीलंकेतील दडपशाहीविरोधात तिथल्या जनतेनं आवाज उठवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांचं घर संतप्त जमावानं पेटवलं. कोलंबोमधील हिंसक निदर्शनांनंतर अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असतानाही त्यांच्या घराबाहेर निदर्शनं सुरू होती. 


यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत जमावानं त्यांचं खासगी घर पेटवून दिलं. घराबाहेर असलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केल्यानं जमाव अधिक चिडला. 



आर्थिक संकटाचा सामना करणा-या श्रीलंकेत पुन्हा हिंसक निदर्शनं सुरु झाली. या आंदोलनानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे निवासस्थान सोडून पळून गेलेत. 


या आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचा मारा केला. वाढत्या तणावामुळे श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. 


श्रीलंकेत अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय.. पेट्रोल-डिझेलचा साठाही संपला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरात घुसून बिर्याणीवर ताव मारला. तसंच त्यांच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त आंदोलनही केली.