मुंबई : ऑर्टन कॅपिटलच्या रिपोर्टनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात पॉवरफूल पासपोर्ट ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांच्याकडे सिंगापूरचा पासपोर्ट आहे त्यांना जगभरात १५९ देशांमध्ये वीजाशिवाय फिरायला मिळणार आहे. ऑर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचं रॅकिंग ७५ वे आहे. तर पाकिस्तानचा क्रमांक ९३ वा आहे. मागील रिपोर्टच्या  तुलनेत आता भारताचा क्रमांक ३ ने सुधारला आहे. सध्या भारताचे रॅंकिंग ७५ आहे. भारतीयांना जगभरातील ५१ देशांमध्ये वीजा फ्री फिरणं शक्य आहे.  


 पासपोर्टच्या या पॉवरफूल खेळामध्ये पाकिस्तान आणि इराकच्या तुलनेत भारताचे स्थान मजबुत आहे. पाकिस्तान आणि इराकचा ९३ वा क्रमांक लागतो. या देशातील प्रवासी केवळ २६ देशांमध्ये वीजा फ्री फिरू शकतात. 
 
 वीजा फ्री म्हणजे काय ?  
 वीजा फ्री फिरणं म्हणजे परदेशात जाण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याची गरज नसते. तेथील सरकार 'वीजा ऑन अरायवल'ची सोय देतात. 
 
 शक्तिशाली पासपोर्टमध्ये कोणाचा क्रमांक कितवा ? 
 सिंगापूर पाठोपाठ जर्मनवासीयांना  १५८ देशांमध्ये वीजा फ्री फिरता येतं. 
शक्तीशाली पासपोर्ट्च्या यादीमध्ये तिसर्‍या क्रमांकावर स्वीडन आणि साऊथ कोरियाचा क्रमांक लागतो. त्यांना १५७ देशांमध्ये वीजा फ्री  फिरण्याची संधी मिळते. 
चौथ्या क्रमांकावर डेन्मार्क, फिनलॅन्ड, इटली,स्पेन,नॉर्वे, जपान,युनाएटेड किंग्डम आणि फ्रान्स  हे देश असून येथील नागरिकांना १५६ देशांत वीजा फ्री फिरता येतं.
पाचव्या क्रमांकावर स्विझरलॅन्ड,नेदरलॅन्ड,बेल्जियम,ऑस्ट्रिया,पोर्तुगाल,लग्जमबर्ग हे देश आहेत येथील नागरिक १५५ देशांमध्ये वीजा फ्री फिरू शकतात.