दुष्ट ड्रॅगनला पडली प्रेमाची गरज, प्रेम करणाऱ्यांसाठी चीन सरकारकडून ही नवी सोय
प्रेम करण्यासाठी खास सुट्टी मिळणार? या प्रांतात करता येतंय लव लीव`साठी अप्लाय
बिजिंग: एरवी मुजोरी करणाऱ्या ड्रॅगनला आता खरी प्रेमाची गरज भासली आहे. याचं कारण म्हणजे या प्रांतातील लोकांसाठी खास सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल की आपल्या देशात अशी सुविधा सरकार कधी सुरू करणार. एरवी चीन विकास आणि इतर स्तरावर कितीही फुशारक्या मारत असला तरीही सामाजिक संबंध आणि प्रेमाच्या बाबतीत मात्र मागे पडत चालल्याचं दिसत आहे.
एकीकडे युवा तरुणींचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. तर दुसरीकडे चीन सरकार तरुणींनी प्रेमसंबंध प्रस्थापित करावे, लग्न करावं आणि लोकसंख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीन सरकार आणि तिथल्या काही कंपन्यांनी पुढाकार घेऊन खास सुविधा 2019 पासून सुरू केली होती. ही सुविधा आजही काही कंपन्यांमध्ये आहे.
चीनमधल्या महिलांना लग्न करायचं नाही. यामागाचं कारण म्हणजे धावपळीच्या आयुष्यात त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करायला वेळ मिळत नाही. ही समस्या दिवसेंदिवस इतकी भीषण होत आहे की तिथल्या कार्यालयांमधून महिलांना सुट्ट्या देण्याची एक विशेष सुविधा सुरू झाली.
EL, PL व्यतिरिक्त इथे महिलांना लव्ह लिव देखील मिळते. ही व्यवस्था 2019 मध्ये जगासमोर आली. आजही महिलांसाठी तिथल्या काही कार्यालयांमध्ये ही सुविधा आहे. महिला लव्ह लिवसाठी अर्ज करू शकतात. यासाठी एकच अट आहे की महिला कर्मचारी अविवाहित असावी आणि वय 30 च्या आसपास असावे.
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने BBC ने मांडलेल्या एक अहवालानुसार पूर्व चीनच्या हांगझाओमधील कंपन्यांनी या अटीत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'डेटिंग लीव' दिली. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली ही व्यवस्था कंपनी आणि शाळांमध्ये आजही सुरू आहे. या सुट्ट्य़ांना लव्ह लिव असं म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये चीनमध्ये सिंगल राहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे.
लोक आपल्या करियरवर फोकस करत आहेत. तर तरुणींना लग्न करून बंधनात अडकवू घ्यायचं नाही. ही अधिक जबाबदारी अंगावर नको असल्याने बऱ्याचदा लग्न होत नाही. त्यामुळे तिथे पुढच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी होईल अशी चिंता सरकारसमोर आहे. ही लोकसंख्या कमी होऊ नये म्हणून सरकारकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शिवाय तरुणींना लग्नासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.
तरुणींना खरं प्रेम शोधण्यासाठी खास अशा प्रकारच्या सुट्ट्या दिल्या जातात. या सुट्ट्यांमधून त्यांनी चांगला जोडीदार निवडावा आणि लग्न करून लोकसंख्या वाढवावी हा हेतू चीन सरकारचा आहे. त्यामुऴे अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.