मुंबई : वयाच्या सहाव्या वर्षी आपण कागदाचे विमान बनवतो आणि उडवतो. किंवा फारफार तर मी मोठेपणी वैमानिक होणार, असे इतरांना सांगतो. मात्र एक मुलगा वयाच्या सहाव्या वर्षी चक्क पायलट झालाय. ‘एतिहाद एअरवेज’न त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडम मोहम्मद आमीर असं त्याचं नाव असून कॉकपीटमध्ये सहवैमानिकाची जबाबदारी पार पाडतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. या मुलाचे विमानाविषयीचे ज्ञान बघून  एतिहाद एअरवेजचे वैमानिकही आश्चर्यचकित झाले. 


अॅडम काही सामान्य मुलगा नाही, हे त्यांनी हेरलं आणि छोट्या अॅडमला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. त्याने व्हिडिओ पाहून, मासिकांमधली माहिती वाचून विमानाबद्दल सारी माहिती मिळवली होती. त्याचं विमानबद्दलचं कमालीचं ज्ञान पाहून एतिहाद एअरवेजनं त्यांला एकदवसीय सहवैमानिकाचं पद दिलं. वैमानिकाच्या सूचना ऐकून विमान चालवणाऱ्या अॅडमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.