सिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !
धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
वाशिंग्टन : धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
‘एपिडेमोलॉजी’ मासिकात हे प्रसिद्ध झाले आहे. मागील दहा वर्षांचा आढावा ह्यात घेण्यात आला आहे. सिगारेटच्या दरात झालेली वाढ आणि त्याचा धूम्रपान करणाऱ्यांवर झालेला परिणाम यांच्या आकडेवारीवरून हे संशोधन मांडण्यात आले आहे. यात दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्यांचीच आकडेवारी मांडण्यात आल्याचे अमेरिकेतील ड्रेक्सेल विद्यापीठातील संशोधिका स्टेफाइन मायने यांनी म्हटले आहे.
संशोधनानुसार सिगारेटच्या किंमती वाढल्याने दीर्घकाळ धूम्रपानाचे व्यसन असणाऱ्यांनीच व्यसन कमी केल्याचे दिसून आले आहे, असे मायने यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरील धूम्रपानाच्या सवयी आणि सिगारेटची किंमत यांचा संबंध यात तपासण्यात आला आहे, असे ड्रेक्सेन विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक अॅमे ऑचिनक्लोस यांनी सांगितले. मागील दहा वर्षांतील लोकसंख्येचा सखोल अभ्यास आणि तंबाखूच्या किमतींचा तपशील याद्वारे ही माहिती मिळविण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.